AUSvsIND: शतकीय खेळी करत अजिंक्यने केली रोहित व मयांक अग्रवालची बरोबरी  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटीतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे प्रभारी नेतृत्वपद अजिंक्य रहाणेकडे आहे. आणि अजिंक्य रहाणेने आपल्या संघासाठी कर्णधारपदाचा डाव खेळत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील 12 वे शतक झळकावले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटीतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे प्रभारी नेतृत्वपद अजिंक्य रहाणेकडे आहे. आणि अजिंक्य रहाणेने आपल्या संघासाठी कर्णधारपदाचा डाव खेळत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील 12 वे शतक झळकावले. दुसर्‍या दिवसाचा म्हणजे आजचा खेळ संपेपर्यंत रहाणेने 200 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह नाबाद 104 धावा केलेल्या आहेत. रहाणेने केलेल्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान संघासमोर 82 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली मिळवली आहे. 

AusvsInd : कांगारुंचे बारा वाजवणारा योगायोग; अजिंक्यच्या नावे झाला अनोखा विक्रम

अजिंक्य रहाणेने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केलेले शतक हे त्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधील तिसरे शतक ठरले आहे. आणि यासह त्याने भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि मयांक अग्रवालची बरोबरी साधली आहे. रोहित आणि मयांक यांनी यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तीन शतके ठोकलेली आहेत. याशिवाय रहाणे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी कर्णधार म्हणून शतक करणारा चौथा खेळाडूही ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली  यांनी ही कामगिरी केलेली आहे. 

AusvsInd : वर्षाचा शेवट गोड होणार? रहाणेच्या भात्यातून निघले पहिले शतक!

त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे हा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी बॉक्सिंग डे कसोटीत प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणून शतक करणारे खेळाडू युसुफ योहाना, सचिन तेंडुलकर आणि एलेक स्टीवर्ट आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार  युसुफ योहानाने 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे सामन्यात शतक झळकावले होते. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 1999 मध्ये हा कारनामा केला होता. व इंग्लंड संघाचे कर्णधार एलेक स्टीवर्ट यांनी सर्वात पहिल्यांदा 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे सामन्यात शतकीय खेळी केली होती.    


​ ​

संबंधित बातम्या