INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करत पांड्याने धोनीला टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

विराटसोबत खेळताना फ्लॉप ठरलेल्या फिंचचा हिट शो!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात  भारतीय संघाची सुरवात म्हणावी तशी झाली नाही. मयांक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल लवकर बाद झाले. मयांक अग्रवाल (22),  विराट कोहली (21), श्रेयस अय्यर (2) आणि केएल राहुल (12) धावांवर बाद झाले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर धवन 79 धावांवर बाद झाला. पण हार्दिकने जबाबदारीने आपला खेळ सुरु ठेवला. मात्र त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक थोडक्याने हुकले. 

हार्दिक पांड्याने 76 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने केवळ 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच हार्दिक पांड्याच्या वनडे कारकिर्दीतील हा सर्वात मोठा डावदेखील ठरला. याव्यतिरिक्त पांड्याने आज केलेल्या खेळीने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला देखील मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याचा हा रेकॉर्ड आता हार्दिकने मागे टाकला आहे. 

महेंद्रसिंग धोनीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत  88 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता 12 वर्षाने धोनीचा हा विक्रम हार्दिकने मागे टाकला आहे. तसेच भारताकडून खेळताना 90 च्या घरात बाद होणार पांड्या हा सातवा फलंदाज ठरला आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -   

हार्दिक पंड्या (2020) - 90 धावा 

एमएस धोनी (2008) -  88 * धावा 
 
कपिल देव (1980) - 75 धावा 

90 च्या घरात बाद होणारे फलंदाज - 

मो अझरुद्दीन - 93 

सचिन तेंडुलकर - 93 

वीरेंद्र सेहवाग - 90 

सचिन तेंडुलकर - 91 

गौतम गंभीर - 92 

गौतम गंभीर - 91 

विराट कोहली - 91 

रोहित शर्मा - 99 

हार्दिक पांड्या - 90 


​ ​

संबंधित बातम्या