अनवाणी पायाने कांगारू उतरले मैदानात; वाचा काय आहे यामागचे कारण   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 17 December 2020

एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे.

एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला डे नाईट सामना आज अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर चालू झाला. भारत आणि पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांना प्रतिस्पर्धी म्हणून ज्याप्रमाणे पाहिले जायचे त्याप्रमाणेच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांना क्रिकेट चाहत्यांकडून पाहण्यात येऊ लागले आहे. आणि त्यामुळे या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. आज सुरु झालेल्या या सामन्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने मैदानावर अनवाणी पायाने आल्याचे पाहायला मिळाले. 

''विराट कोहली ज्याप्रकारे बाद झाला ते निराशाजनक'' 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सुरु होण्याअगोदर ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनी अनवाणी पायाने मैदानावर येत वर्णद्वेषाविरोधात निषेध नोंदविला. वंशविरोधी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आणि ऑस्ट्रेलियन लोकांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने अनवाणी पायाने मैदानात प्रवेश करत गोल केले होते. व यानंतर नाणेफेक होऊन ऑस्ट्रेलियन संघाने खेळास सुरवात केली. 

कोरोनाच्या काळानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ पहिल्यांदाच कसोटी सामन्यासाठी मैदानावर उतरले आहेत. व अ‍ॅडिलेड येथे होत असलेला डे नाईट सामना या दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच होत आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत सात डे नाईट सामने खेळलेले आहेत. तर भारतीय संघाने केवळ एकच डे नाईट सामना खेळलेला आहे.      

       


​ ​

संबंधित बातम्या