ICC ने दिला पार्थिव पटेलच्या विश्वविक्रमी आठवणीला उजाळा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या पार्थिव पटेलनं 8 ऑगस्ट 2002 मध्ये  इंग्लंड विरुद्धच्या ट्रेंट ब्रिज मैदानातून पदार्पण केले होते. 17 वर्ष 152 दिवसांचा असताना त्याने पहिला कसोटी सामना खेळला होता.

 Parthiv Patel Retirement Cricket : भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पदार्पणानंतर 18 वर्षांनी त्याने हा निर्णय घेतला. पार्थिव पटेलच्या नावे एका अनोख्या विश्वविक्रमाची नोंद आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आपल्या नावे विक्रमाची नोंद केली होती. 8 वर्षांपूर्वीचा पार्थिव पटलेलनं केलेला हा विक्रम अद्यापही आबाधित आहे.  

डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या पार्थिव पटेलनं 8 ऑगस्ट 2002 मध्ये  इंग्लंड विरुद्धच्या ट्रेंट ब्रिज मैदानातून पदार्पण केले होते. 17 वर्ष 152 दिवसांचा असताना त्याने पहिला कसोटी सामना खेळला होता. पुरुष क्रिकेटमध्ये विकेट किपर म्हणून सर्वात कमी वयात कसोटी खेळण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावे आहे. या यादीत  पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 17 वर्ष 300 दिवस इतके वय असताना कसोटी सामना खेळला होता.  

Australia vs India कांगारुंना मोठा धक्का; वॉर्नर पहिल्या टेस्टमधून आउट

2002 मध्ये पदार्पण केल्यानंतर पार्थिव पटेलनं 2004 पर्यंत सातत्याने टीम इंडियाचा सदस्य राहिला. महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर पार्थिव पटेल मागे पडला. पार्थिव पटेलनं निवृत्ती घेतल्यानंतर आयसीसीने ट्विट करुन त्याच्या खास विक्रमाला उजाळा दिलाय. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळांडूची यादी आयसीसीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. 

कसोटीत पदार्पण करणारे युवा विकेट किपर 
17 वर्ष 152 दिवस - पार्थिव पटेल
17 वर्ष 300 दिवस - हनीफ मोहम्मद
18 वर्ष 66 दिवस - ततेंदा ताइबू
18 वर्ष 167 दिवस - इकराम अली खिल
19 वर्ष 52 दिवस - असंका गुरुसिन्हा


​ ​

संबंधित बातम्या