AUSvsIND : विराटच्या अनुपस्थितीवर पॉन्टिगनंतर आता इयान चॅपल यांचा शाब्दिक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर या दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. येत्या 27 तारखेपासून भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धचे युद्ध चालू होण्यास अजून बरेच दिवस बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंकडून शाब्दिक हल्ल्याची सुरवात झाली आहे. 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्वंद्व सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिगने शाब्दिक हल्ले केले होते. व त्यानंतर आता माजी कर्णधार इयान चॅपल यांनी देखील वाकयुद्धात उडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. विराट कोहली परतल्यानंतर भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण होणार असल्याचे इयान चॅपल यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे भारतीय संघासमोर निवडीचा प्रश्न उदभवणार असल्याचे चॅपल यांनी सांगितले आहे. आणि त्यानंतरच मालिकेचा निर्णय होणार असल्याचे मत इयान चॅपल यांनी व्यक्त केले आहे. 

याव्यतिरिक्त, कोहलीच्या जाण्यानंतर भारतीय संघातील नव्या युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची मोठी संधी असल्याचे इयान चॅपल यांनी म्हटले आहे. याशिवाय दोन्ही संघात होणारी ही मालिका रोमांचक वळणावर पोहचत असल्याचे सांगत, आता निवड समितीचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच निकालाची पातळी देखील खाली येऊ शकते आणि यावरूनच निर्भय निवडकर्ता कोण हे ठरणार असल्याचे इयान चॅपल यांनी म्हटले आहे.  यापूर्वी विराट कोहली संघात असताना भारतीय संघ निश्‍चितच वरचढ आहे, परंतु तो माघारी गेल्यानंतर भारतीय संघ दुबळा होईल, असा अंदाज पॉन्टिगने व्यक्त केला होता.

रोहित-विराट 'वाटणीवर'; कपिलपाजींचा 'कल्चर' स्ट्रोक

दरम्यान, शेवटच्या तीन कसोटी सामन्यांत विराट कोहलीची अनुपस्थितीचा भारतीय संघावर मोठा परिणाम होईल, त्यामुळे इतर खेळाडूंवर त्याचे दडपण येईल. अजिंक्‍य रहाणे कर्णधार होण्याची शक्‍यता आहे, पण या जबाबदारीचे त्याच्यावर दडपण येईल आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा प्रश्‍न भारतीय संघासमोर असेल, असे पॉन्टिगने म्हटले होते. विराट कोहली मायदेशी परतल्यावर भारतीय संघ संभ्रमावस्थेत जाईल. पहिल्या कसोटीत असणारी फलंदाजीची क्रमवारी बिघडली जाईल, सलामीला कोणी खेळायचे, असा प्रश्‍न निर्माण होईल. भारताकडे जसप्रित बुमरा, महम्मद शमी त्यांच्या साथीला उमेश यादव, नवदीप सैनी किंवा महम्मद सिराज असे वेगवान गोलंदाज असले तरी फलंदाजीबाबत ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय संघासमोरच अधिक प्रश्‍न असतील, असा दावा पॉन्टिगने केला होता.     


​ ​

संबंधित बातम्या