रोहितसारख्या दुखण्यानं घेरलं; टीम इंडियातील गड्याला मायदेशी धाडलं

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 December 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला नेट प्रॅक्टिसमध्ये ईशान पोरेलसह टी. नटराजन, आणि कार्तिक त्यागी या तिघांचा समावेश होता. नटराजनला यापूर्वीच वनडेत स्थान मिळाले असून पोरेलच्या दुखापतीनंतर आता केवळ कार्तिक त्यागीच नेट प्रॅक्टिससाठी उपलब्ध असणार आहे.  

पश्चिम बंगालचा नवोदित गोलंदाज ईशान पोरेल याला ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागणार आहे. नेटमधील सरावा दरम्यान त्याला स्नायू दुखावला गेला असून त्याला मायदेशी पाठवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून ईशान पोरेल भारतामध्येच आहे. पायाचा स्नायू दुखावल्याने त्याला मायदेशी पाठवण्यात आले असून बंगळुरु स्थित राष्ट्रीय अकादमीतील चाचणीनंतर त्याची दुखापत कितपत गंभीर आहे हे समोर येणार आहे.  

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला नेट प्रॅक्टिसमध्ये ईशान पोरेलसह टी. नटराजन, आणि कार्तिक त्यागी या तिघांचा समावेश होता. नटराजनला यापूर्वीच वनडेत स्थान मिळाले असून पोरेलच्या दुखापतीनंतर आता केवळ कार्तिक त्यागीच नेट प्रॅक्टिससाठी उपलब्ध असणार आहे.  

"रोहितशिवाय वनडेत 350+धावा करणे मुश्किल"

सुरुवातीला पोरेल, त्यागी, नटराजन आणि कमलेश नागरकोटी यांना नेट प्रक्टिससाठी संघासोबत ठेवण्यात आले होते.  आयपीएलमध्ये पोरेलला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याला एकही संधी मिळाली नाही. रणजी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफीशिवाय न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या नेट बॉलमध्ये निवड झाली होती.  यापूर्वी  2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपमधील दुखापतीनंतर मोठा ब्रेक घेतला होता. मागील वर्षी त्याने दमदार पदार्पण करत स्थानिक क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती. 

शाहरुखच्या KKR ची मोठी खेळी; अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये मारली उडी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावत भारतीय संघाने मालिका गमावली आहे. तिसरा सामना जिंकून टी-20 मालिकेत आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी संघ प्रयत्नशील असेल.  


​ ​

संबंधित बातम्या