सिराजच्या वडिलांचे निधन; अखेरचा निरोप देण्यासाठी क्वारंटाईन नियमानं रोखलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासोबत असलेल्या सिराजपर्यंत हे वृत्त पोहचले आहे. पण क्वारंटाईन नियमानुसार त्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला मायदेशी परतणे शक्य नाही.
नेट प्रॅक्टिसनंतर सिराजला वडील गेल्याची बातमी मिळाली.

भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले आहे. सिराजचे वडील  मोहम्मद गाउस यांनी वयाच्या 53 व्या वर्षी हैदराबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  
स्पोर्टस् स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासोबत असलेल्या सिराजपर्यंत हे वृत्त पोहचले आहे. पण क्वारंटाईन नियमानुसार त्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला मायदेशी परतणे शक्य नाही.
नेट प्रॅक्टिसनंतर सिराजला वडील गेल्याची बातमी मिळाली. राष्ट्रीय संघात खेळून देशासाठी खेळावे, अशी वडिलांची इच्छा होती. चांगली खेळी करुन त्यांचे स्वप्न पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया सिराजने दिली आहे.

वडील माझे खूप मोठे समर्थक होते. देशासाठी खेळून नाव करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मनातील गोष्ट जाणून त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करु शकलो, असेही सिराज म्हणाला.  


​ ​

संबंधित बातम्या