AUSvsIND : शमीनं फाटलेला शूज घालण्यामागचं कारण माहितेय का?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अ‍ॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवशीच्या केलेल्या 233 धावांच्या पुढे खेळताना भारतीय संघ दुसऱ्या दिवशी फक्त 11 धावा अधिक करू शकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला. व ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करताना भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा चर्चेचा विषय ठरला.

AUS vs IND 1st Test Day 2 : टीम इंडिया फ्रंटफूटवर आली, पण...

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळेस भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पायात फाटलेला शुज घालून गोलंदाजी करताना दिसला. भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपल्यावर भारतीय गोलंदाजीला जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी सुरवात केली. व त्यानंतर मोहम्मद शमी जेंव्हा गोलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळेस त्याच्या उजव्या पायाचा शूज फाटला होता. व यावेळी ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अ‍ॅडम गिलक्रिस्ट, मार्क वॉ आणि शेन वॉर्न सामन्याचे समालोचन करत होते. आणि त्यांनी याबाबत चर्चा केल्याचे पाहायला मिळाले. 

याशिवाय वॉर्नने शमीच्या गोलंदाजीच्या पद्धतीविषयी बोलताना सांगितले की, आर्म एक्शनमुळेच हे घडले असावे. जेंव्हा गोलंदाजांची अ‍ॅक्शन हाय आर्म असते त्यावेळेस तो जेंव्हा चेंडू टाकतो तेंव्हा त्याच्या उजव्या पायाचा अंगठा शूजच्या आतील बाजूस लागत असल्याने त्याचा गोलंदाजीला त्रास होतो, असे शेन वॉर्नने सांगितले. आणि म्हणूनच चेंडू टाकताना याचा प्रभाव होऊ नये म्हणून गोलंदाज शूजला होल पाडतात, असे वॉर्नने स्पष्ट केले. 

अनवाणी पायाने कांगारू उतरले मैदानात; वाचा काय आहे यामागचे कारण   

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखले. यावेळेस उमेश यादवने तीन, जसप्रीत बुमराहने दोन आणि आर अश्विनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.         


​ ​

संबंधित बातम्या