AUS vs IND : टीम इंडियाला मोठा धक्का; फॅक्चरमुळं शमी झाला आउट!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

बीसीसीआयने एका निवेदनाच्या माध्यमातून मोहम्मद शमीच्या दुखापतीसंदर्भात माहिती दिली आहे. हाताला फॅक्चर असल्यामुळे तो आगामी सामन्यात खेळण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Mohammed Shamis injury AUS vs IND Test :ऍडलेडच्या मैदानातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात दुखापतग्रस्त झालेला शमी कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्याला मुकणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांनी भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. याच डावात कमिन्सचा एक उसळता चेंडू शमीला लागला होता. हातावर वेगाने आदळलेल्या चेंडूमुळे त्याला मैदानात सोडावे लागले. स्कॅननंतर त्याचा हात फॅक्चर असल्याचे समोर आले असून पुढील सामन्याला तो खेळणे मुश्किलच आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. 
  
बीसीसीआयने एका निवेदनाच्या माध्यमातून मोहम्मद शमीच्या दुखापतीसंदर्भात माहिती दिली आहे. हाताला फॅक्चर असल्यामुळे तो आगामी सामन्यात खेळण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शमीच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजला संधी मिळण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. सराव सामन्यात सिराजने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे मोहम्मद शमीच्या जागी त्याला संधी देण्याचा इशाराही दिलाय. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला 8 विकेटसनी पराभूत व्हावे लागले होते. तिसऱ्या दिवशीच संघाने शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले. 26 डिसेंबर (बॉक्सिंग डे) मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. 

कोहलीला हटवा; टीम इंडियाच्या फ्लॉपशोनंतर हिटमॅनचा ट्रेंड

पॅटर्निटी लिव्हमुळे कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाला असला तरी क्वारंटाईन कालावधी पूर्ण न झाल्याने दुसऱ्या सामन्यात तोही संघाचा भाग नसेल. यात आता मोहम्मद शमीची उणीव भासणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला प्रभावी मारा करता आला नसला तरी तो एक भारतीय ताफ्यातील अनुभवी आणि प्रमुख गोलंदाज होता. त्यामुळे शमीची उणीव भारतीय संघाला नक्कीच जाणवेल. 


​ ​

संबंधित बातम्या