INDvsAUS : विराट मायदेशी परतण्याअगोदर टीम इंडियाने चांगले प्रदर्शन करणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा येत्या 27 तारखेपासून सुरु होणार आहे. हा दौरा चालू होण्यासाठी अवघे तीनच दिवस बाकी आहेत.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा येत्या 27 तारखेपासून सुरु होणार आहे. हा दौरा चालू होण्यासाठी अवघे तीनच दिवस बाकी आहेत. मात्र हे दोन्ही संघ मैदानावर आमने-सामने येण्यापूर्वीच शाब्दिक वातावरण चांगलेच तापले आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिग, इयान चॅपल यांच्यानंतर आता मायकल क्लार्कने देखील शाब्दिक युद्धात उडी घेतली आहे. टीम इंडियाने कर्णधार विराट कोहली मायदेशी परतण्याअगोदर एकदिवसीय आणि टी20 स्पर्धेत चांगले प्रदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे. 

INDvsAUS : टीम इंडियाची चिंता वाढली; रोहित आणि इशांत खेळण्याची शक्यता कमी    

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय, टी 20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराट कोहली परतण्यापूर्वी भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी20 सामन्यात चांगली कामगिरी केली नाहीतर भारताला कसोटी मालिका 4-0 ने गमावण्याची वेळ येईल, असे  मायकल क्लार्कने म्हटले आहे. याशिवाय एकदिवसीय आणि टी सामन्यात कोहलीला दमदार कामगिरी करावी लागणार असल्याचे क्लार्कने सांगितले आहे. 

मात्र टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी20 सामन्यात खराब प्रदर्शन केले तर भारतीय संघाला कसोटी सामन्यांमध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता मायकल क्लार्कने वर्तविली आहे. इतकेच नाहीतर टीम इंडिया कसोटी मालिका 4-0 ने गमावू शकतो, असे क्लार्कने म्हटले आहे. याव्यतिरिक्त कोहली फक्त एक कसोटी सामना खेळणार आहे. आणि तरीदेखील तो कसोटी मालिकेच्या निकालावर प्रभाव टाकू शकतो, असे क्लार्कने नमूद केले आहे. तसेच हे फक्त एकदिवसीय आणि टी20 मालिकेत दमदार कामगिरी केल्यास घडण्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले आहे. 

यानंतर भारतीय संघातील गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील मोठी प्रभावी कामगिरी करण्याची शक्यता असल्याचे मायकल क्लार्कने म्हटले आहे. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संघावर दबाव निर्माण करण्यासाठी जसप्रीत बुमराहला आक्रमकतेने गोलंदाजी करावी लागणार असल्याचे क्लार्कने सांगितले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवायचा असल्यास विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला दमदार खेळ करावा लागणार असल्याचे त्याने अधोरेखित केले. 

INDvsAUS : धवनने शेअर केला खास फोटो ; असा असेल टीम इंडियाचा नवा लूक 

दरम्यान, शेवटच्या तीन कसोटी सामन्यांत विराट कोहलीची अनुपस्थितीचा भारतीय संघावर मोठा परिणाम होईल, त्यामुळे इतर खेळाडूंवर त्याचे दडपण येईल. अजिंक्‍य रहाणे कर्णधार होण्याची शक्‍यता आहे, पण या जबाबदारीचे त्याच्यावर दडपण येईल आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा प्रश्‍न भारतीय संघासमोर असेल, असे पॉन्टिगने म्हटले होते.                      


​ ​

संबंधित बातम्या