AUSvsIND 3 T20: अर्धशतकाच्या खेळीसह मॅथ्यू वेडने केला नवा विक्रम  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 187 धावांचे लक्ष्य भारतीय संघाला दिले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 187 धावांचे लक्ष्य भारतीय संघाला दिले आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरऑस्ट्रेलियाच्या संघाने मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात पाच गडी गमावत 186 धावा केल्या आहेत. 

हार्दिक पांड्या हा धोनी आणि युवराज सिंग सारखा फलंदाज 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर वेड आणि मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला सावरत 90 धावांची भागीदारी रचली. वेडने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक केले. त्यानंतर मॅथ्यू वेडने 53 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 80 धावा केल्या. वेडने आजच्या सामन्यात केलेली ही खेळी टी-ट्वेन्टीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारताविरुद्धची सगळ्यात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वीच्या सामन्यात मॅथ्यू वेडने 72 धावा केल्या होत्या. त्याशिवाय वेड हा टी-ट्वेन्टी ऑस्ट्रेलियाचा पहिला विकेटकिपर फलंदाज ठरला आहे, ज्याने सलग तीन अर्धशतके लगावली आहेत.     

भारतीय संघाला 2016 ची पुरावृत्ती करण्यासाठी 186 धावांचे लक्ष्य 

याव्यतिरिक्त, टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये विकेटकिपर फलंदाज म्हणून भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मॅथ्यू वेड तिसऱ्या स्थानावर पोहचलेला आहे. भारताविरुद्ध विकेटकीपर म्हणून सर्वात मोठा डाव खेळणारा खेळाडू ब्रॅंडन मॅक्युलम आहे. त्याने 91 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर सायफर्ट असून त्याने 84 धावा केल्या होत्या. यानंतर आता मॅथ्यू वेड तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याने आजच्या सामन्यात  80 धावा केल्या आहेत. व 79 धावांसह क्विंटन डिकॉक चौथ्या आणि कुमार संगकारा 78 धावाांसह पाचव्या क्रमांकावर आहे   

त्यानंतर, मॅक्सवेलने 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या आहेत. त्यामुळे मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकात 186 धावा केल्या आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या