AUSvsIND : वार्नर म्हणतो; उरले-सुरले दिवस स्लेजिंग न करता खेळणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर या दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. येत्या 27 तारखेपासून भारतीय संघाचा हा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैदानावरील चुरस सुरु होण्यापूर्वीच आजी-माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक हल्ले चालू झाले आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने भारतासोबतच्या मालिकेत संयम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

शास्त्री म्हणाले, लवकर फ्लाइट पकडा नाहीतर तुमचं काही खरं नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका सुरु होण्याअगोदर घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना, डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले काही दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे आपण आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका कायम राखणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आगामी भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये स्लेजिंग पासून दूर राहणार असल्याचे वॉर्नरने म्हटले आहे. 

याशिवाय, डेव्हिड वॉर्नरने या मुलाखतीत एक आक्रमक सलामीवीर म्हणून आपल्या फलंदाजी विषयी देखील चर्चा केली. याव्यतिरिक्त नुकतेच आपण 34 वर्षांचा झालो आहे, आणि त्यामुळे 30 वर्षे वयाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपले कमी दिवस राहिले असल्याचे त्याने सांगितले. व यात जोखीम असली तरी, सुज्ञ क्रिकेट देखील खेळण्याचा विचार असल्याचे वॉर्नरने यावेळी नमूद केले. इतकेच नाही तर भारतीय खेळाडूंनी उचकावण्याचा प्रयत्न केला तरी आपण शांत राहणार असल्याचे डेव्हिड वॉर्नर म्हणाला. आणि शाब्दिक खेळाऐवजी आपल्या फलंदाजीने मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे  वॉर्नरने म्हटले आहे. 

AUSvsIND : विराटच्या अनुपस्थितीवर पॉन्टिगनंतर आता इयान चॅपल यांचा शाब्दिक हल्ला

त्यानंतर, भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या रोहित शर्माशिवाय मैदानात उतरत असल्याने त्याची भरपाई होणे कठीण असल्याचे मत डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले. मात्र विराट कोहली मध्ये ही पोकळी भरून काढण्याची क्षमता असल्याचे त्याने म्हटले आहे. तर कसोटी मालिकेत विराटच्या अनुपस्थितीनंतर देखील लोकेश राहुल, शिखर धवन आणि मयांक अग्रवाल सारखे खेळाडू असल्यामुळे सर्वच सामने रंगतदार होणार असल्याची शक्यता वॉर्नरने व्यक्त केली.              


​ ​

संबंधित बातम्या