AUS vs IND : भारतासोबत भिडण्यापूर्वी कांगारुंना आणखी एक धक्का!

सकाळ ऑनलाईन स्पोर्ट्स
Saturday, 12 December 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ही तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने झाली होती. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची टी20 मालिका जिंकली. त्यानंतर आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

India Tour Of Australia 2020 : भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे वॉर्नर आउट झाल्यानंतर आता कांगारुंना आणखी एक धक्का बसला आहे. वॉर्नर पाठोपाठ विल पुकोवस्की दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहे. वॉर्नरला भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उर्वरित एक वनडे आणि टी-20 मालिकेसह पहिल्या कसोटीतून माघार घेण्याची नामुष्की ओढावली होती. 

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळताना एर उसळता चेंडू पुकोवस्कीच्या डोक्याला लागला होता. या दुखापतीमुळे 17 डिसेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटीला तो मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनामधून दोन्ही खेळाडू (वॉर्नर आणि पुकोवस्की) बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मैदानात खेळताना दिसतील असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष ट्रेवर होंस यांनी स्थानिक प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केले.

हिटमॅन फिट है! टेस्ट पास झालेला रोहित प्लाइट कधी पकडणार?

संघातील खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्या पाहता मार्कस सारखा खेळाडू दुखापतीतून सावरल्याचा आनंद आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मार्कसने उत्तम कामगिरी केली असून तो संघासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी व्यक्त केलाय. डेव्हिड वॉर्नर आणि पुकोवस्की संघात नसल्याची उणीव भासेल, पण ते लवकर फिट होऊन संघात परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ही तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने झाली होती. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची टी20 मालिका जिंकली. त्यानंतर आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या