AusvsInd : धवनच्या सहकाऱ्याबाबत निर्णयच नाही, राहुलची पसंती मधल्या फळीस 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

काही वर्षांपासून भारतीय संघात असलो, तरी सातत्याने एकदिवसीय लढतीसाठी निवड झाली नाही. अर्थात आयपीएलप्रमाणे तिहेरी (उपकर्णधार, फलंदाज,  यष्टिरक्षक) कमगिरीस मी तयार आहे. त्या स्पर्धेप्रमाणेच चांगल्या कामगिरीचे लक्ष्य असल्याचे सांगितले. मात्र सलामीवीरांबाबत काहीही बोलणे टाळले.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका दोन दिवसांवर आली आहे; पण रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या साथीत डावाची सुरुवात कोण करणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे. उपकर्णधार के. एल. राहुलने आपल्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्यास आवडेल, असे सांगितल्याने हा प्रश्न कायम राहिला.

भारत - ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेस २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी उपकर्णधार राहुलच्या पत्रकार परिषदेनंतर संघाची फलंदाजीची क्रमवारी स्पष्ट होईल, अशी अपेक्षा होती. राहुलने त्याच्या क्रमांकाबाबतही टिप्पणी टाळली. 
लढत कोणत्या प्रकारातील आहे, यावर माझा फलंदाजीचा क्रमांक अवलंबून असेल. संघाच्या स्वरूपानुसारही फलंदाजीचा क्रमांक ठरेल. यापूर्वीच्या एकदिवसीय मालिकेत मी पाचव्या क्रमांकावर खेळलो होतो; तसेच यष्टिरक्षणही केले होते. आत्ताही तेच करणे मला आवडेल. अर्थात संघ सोपवणार असलेली जबाबदारी पार करण्यास तयार आहे, असे राहुलने सांगितले. 

काही वर्षांपासून भारतीय संघात असलो, तरी सातत्याने एकदिवसीय लढतीसाठी निवड झाली नाही. अर्थात आयपीएलप्रमाणे तिहेरी (उपकर्णधार, फलंदाज,  यष्टिरक्षक) कमगिरीस मी तयार आहे. त्या स्पर्धेप्रमाणेच चांगल्या कामगिरीचे लक्ष्य असल्याचे सांगितले. मात्र सलामीवीरांबाबत काहीही बोलणे टाळले.

शिखर धवन हा नक्कीच डावाची सुरुवात करेल; पण त्याचा सहकारी कोण, हा प्रश्न आहे. मयांक अगरवाल, शुभमन गिल आणि राहुल हे पर्याय होते. राहुल मधल्या फळीत खेळल्यास शुभमन आणि मयांकमध्ये चुरस असेल. कसोटीसाठी उपयुक्त मानल्या जात असलेल्या मयांकने आयपीएलमध्ये 11 डावात 156.45 च्या सरासरीने 424 धावा केल्या; तर गिलने 117.96 च्या सरासरीने 14 डावात 440  गिलमध्ये आक्रमकतेचा अभाव होता, असेच अनेकांचे मत आहे. दोघेही यापूर्वीच्या न्यूझीलंड दौऱ्यात यशस्वी ठरले नव्हते. अर्थात रोहित परतल्यावर ते राखीव सलामीवीरच असतील.

आयपीएलने प्रत्येक क्षणानुसार निर्णय घेण्यास शिकवले. फलंदाजी करीत असताना एक फलंदाज म्हणूनच परिस्थितीचा आढावा घ्यायचा, तर गोलंदाजाने धाव घेण्यास सुरुवात केल्यावर यष्टिरक्षणावर लक्ष केंद्रित करायचे. या वेळी कर्णधार असल्याचा विचार बाजूला सारणे महत्त्वाचे असते. खेळाडू म्हणून तीनही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे आवश्‍यक आहे - के. एल. राहुल, भारताचा उपकर्णधार


​ ​

संबंधित बातम्या