पॅटर्निटी लीववर 'विराट' चर्चा, गावसकरांचा मास्टर स्ट्रोक तर कपिल पाजींची गुगली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. विराट कोहलीला बीसीसीआयकडून पॅटर्निटी लीव मंजूर करण्यात आली आहे. मात्र यामुळे अनेकांनी बीसीसीआय आणि विराट कोहलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराटच्या कर्णधारपदावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरवात केली आहे.

AUSvsIND : भारतीय संघ व्हाईटवॉश टाळणार का ? 

कोरोनाच्या संकटापूर्वी भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून तीनही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. आणि या पराभवाबरोबरच भारताला मालिका देखील गमावण्याची नामुष्की ओढवली. या एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या टी-20 मालिकेत आणि कसोटी मालिकेचा एक सामना खेळून कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्याच्या या रजेवर खेळजगतात चांगलीच चर्चा रंगली असून, आता काही माजी क्रिकेटपटूंनी देखील याबद्दल वक्तव्य केले आहे.   

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी यासंदर्भात बोलताना आता काळ बदललेला असल्याचे म्हटले आहे. मात्र यापूर्वी कोणताही खेळा़डू मालिका अर्ध्यावर सोडून परतू शकत नव्हता. त्यामुळे नक्कीच हा बदल झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी देखील याविषयीचे  मौन सोडले आहे. गावस्कर यांनी यासंदर्भात बोलत, जेव्हा आपण न्युझीलंड आणि वेस्टइंडिज दौऱ्य़ासाठी भारतीय संघाबरोबर रवाना झालो, त्याचवेळेस आपण परतण्यापूर्वी बाळाचा जन्म झालेला असेल हे माहित होते. शिवाय आपण भारतीय संघात खेळण्याप्रती कटिबद्ध होतो. व अशावेळी आपल्या पत्नीचे सहकार्य लाभल्याचे गावस्कर यांनी सांगितले. तसेच, यावेळी सुनील गावस्कर यांनी आपण कोणतीही पॅटर्निटी लीव वैगेरे मागितली नसल्याचे देखील  सांगितले. व बीसीसीआयने देखील याबद्दल कोणतीही विचारणा करण्यात आली नसल्याचे त्यांनी नमूद केले.  

AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे        

दरम्यान, विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटर्निटी लीव देण्यात आली आहे. व त्याला रजा मिळाल्यानंतर सुनील गावस्कर यांच्या 1975/76च्या एका किस्याची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. भारतीय संघ त्यावेळी न्युझीलंड आणि वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर असताना सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन याचा जन्म झाला होता. व त्यावेळेस बीसीसीआयने गावस्कर यांनाअशी कोणती लीव देण्यास नकार दिला होता.


​ ​

संबंधित बातम्या