"बाऊंस असलेल्या खेळपट्ट्या पाहून उतावीळ होऊ नका" 

शैलेश नागवेकर
Wednesday, 16 December 2020

ऑस्ट्रेलियात अधिक उसळी असलेल्या खेळपट्ट्या पाहून उतावीळ होऊ नका दिशा आणि टप्प्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला भारताचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज कपिलदेव यांनी बुमरा आणि कंपनीला दिला आहे. 

कोलकाता : ऑस्ट्रेलियात अधिक उसळी असलेल्या खेळपट्ट्या पाहून उतावीळ होऊ नका दिशा आणि टप्प्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला भारताचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज कपिलदेव यांनी बुमरा आणि कंपनीला दिला आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या कोणते नवे रेकॉर्डस् होऊ शकतात उद्याच्या सामन्यात 

ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर यशस्वी ठरू शकणारा ईशांत शर्मा संघात नसला, तरी जसप्रित बुमरा, महम्मद शमी, उमेष यादव, महम्मद सिराज आणि नवदीप सैनी असे भेदक वेगवान गोलंदाज संघात आहेत. आपल्या संघात असे नावाजलेले गोलंदाज असले, तरी ते ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर अनुभवात कमी आहे, असे कपिल यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियातील अनुभव कमी असल्यामुळे जर उसळी असलेली खेळपट्टी पाहिल्यावर आपल्या गोलंदाजांना अधिक आखूड टप्प्याचा मारा करण्याचा मोह होऊ शकतो. आपला वेग आणि क्षमता याचा अंदाज घेऊनच टप्पा निश्‍चित करावा, असे कपिल यांनी म्हटले आहे. 

''विराट कोहलीसाठी बऱ्याच योजना आखल्या आहेत'' 

आपले गोलंदाज सक्षम असले, तरी मायदेशातील परिस्थितीचा त्यांना जास्त अनुभव आहे, हे आपण विसरून चालणार नाही, असे सांगताना कपिलदेव यांनी प्रकाशझोतातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे मत मांडले. ऍडलेडवर आपण प्रथमच प्रकाशझोतातील सामना खेळत आहोत; तर ऑस्ट्रेलिया तेथे पाच सामने खेळले आहेत आणि सर्व सामन्यात जिंकलेले आहेत. 

वर्ल्डकपपेक्षा 'हा' क्षण मोलाचा 
कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये विश्‍वकरंडक जिंकला होता, या संदर्भात विचारले असता कपिल म्हणाले, देशाकडून मी पहिल्यांदा खेळलो तो क्षण माझ्यासाठी वर्ल्डकप विजेतेपदापेक्षा एक हजार पटीने अधिक होता. कारण देशाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे पहिले स्वप्न होते.


​ ​

संबंधित बातम्या