मानहानीकारक पराभवानंतर आयपीएस अधिकाऱ्याकडून विराटची पाठराखण 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 21 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. भारतीय संघाच्या या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कोणताही खेळाडू 9 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर युझर्स भारतीय संघावर चांगलेच भडकले आहेत. मात्र भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी यांनी खेळात असे कधी कधी होऊ शकते, असे सांगत संघाचा कर्णधार विराट कोहलीला तणाव न घेण्याचा सल्ला दिला आहे. 

हिटमॅनसोबत वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटरची बर्थडे दिवशी निवृत्ती

आयपीएस अधिकारी असलेले आर के विज यांनी, भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केलेल्या धावांच्या आकड्यांचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावरील ट्विटरवर शेअर केला आहे. व या पोस्ट सोबतच त्यांनी, खेळात होते कधी कधी असे लिहीत, संघाचा कर्णधार विराट कोहलीला फारसे टेन्शन घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच आर के विज यांनी, विराट कोहलीला तू सर्वोत्कृष्ट कर्णधार आहेस. आणि संपूर्ण देश हे जाणतो व विश्वास ठेवतो, असे आर के विज यांनी पुढे आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. 

ICC Test Rankings: विराटची प्रगती; पण स्मिथ घसरुनही आघाडीवर

दरम्यान,  पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 244 धावांवर बाद झाला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 36 धावांवर बाद झाला होता. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे.      

 


​ ​

संबंधित बातम्या