पुजाराला लढवय्या का म्हणायचं? रवी शास्त्रींचं पटत नसेल तर आकडेवारी बघा

टीम ई सकाळ
Tuesday, 19 January 2021

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ब्रिस्बेन कसोटी भारताने विजय मिळवत मालिकाही खिशात टाकली. या सामन्यात भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने मैदानात अक्षरश: नांगर टाकून उभा होता. 

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ब्रिस्बेन कसोटी भारताने विजय मिळवत मालिकाही खिशात टाकली. या सामन्यात भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने मैदानात अक्षरश: नांगर टाकून उभा होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरेपूर दमछाक त्याने केली. संथ खेळी करूनही पुजाराच्या नावावर काही विक्रम जमा झाले. त्याने कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतकही केलं. 

ऑस्ट्रेलिया भारत यांच्यातील चार कसोटींच्या मालिकेत दोन्ही संघांमध्ये पुजारा सर्वाधिक काळ मैदानावर राहिलेला आणि सर्वाधिक चेंडू खेळलेला फलंदाज ठरला आहे. त्याने एकूण चार कसोटीत 928 चेंडू खळले आहेत. यामध्ये 271 धावा काढल्या असून 77 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पुजाराची धावांची सरासरी 33 पेक्षा जास्त होती. त्याच्यानंतर मार्नस लॅब्युशेनने 850 चेंडू खेळले आहेत. मात्र लॅब्युशेन सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. लॅब्युशेनने 53.25 च्या सरासरीने 426 धावा केल्या. याशिवाय स्मिथने 612 चेंडू खेळताना 313 धावा काढल्या आहेत. 

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा sakalsports.com

सामन्यानंतर बोलताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुजाराचं कौतुक करताना म्हटलं होतं की, तो आमचा बॅटलमॅन आहे. तर कर्णधार अजिंक्य रहाणेनंसुद्धा पुजाराच्या खेळीबद्दल बोलताना सांगितलं की, एका बाजुने पुजाराने खिंड लढवली त्यामुळे पंतला दुसऱ्या बाजुने फटकेबाजी करू शकत होता. 

हे वाचा - सावधान इंडिया! आनंदानं हुरळून जाऊ नका; इंग्लंडच्या दिग्गजाचा इशारा

पुजाराने 196 चेंडू खेळताना चौकार मारून अर्धशतक पूर्ण केलं. सामन्यात धावांची आवश्यक गती वाढल्यानंतर पुजाराने आक्रमक खेळ केला. याआधीच्या सिडनी कसोटीत पुजाराने 174 चेंडूत अर्धशतक केलं होतं. 2018 मध्ये त्याने 173 चेंडूंचा सामना करताना 50 धावा केल्या होत्या. पुजाराने ब्रिस्बेन 211 चेंडूत पुजाराने 56 धावा केल्या आहेत. यात त्यानं 7 चौकारही लगावले. 


​ ​

संबंधित बातम्या