'अंपायर्स कॉल'वर सचिन तेंडुलकर नाखूश!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघातील दोन गड्यांना अंपायर कॉलमुळं मिळाले जीवदान

Sachin Tendulkar Unhappy With Umpires Call Rule भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने DRS प्रणालीवर आक्षेप नोंदवला आहे. DRS मध्ये अंपायर कॉलचा नियम त्याला पटत नाही. यासंदर्भात सचिन तेंडुकरने एक ट्विट केले आहे. मैदानातील पंचांनी निर्णयावर नाखूश असल्यामुळेच खेळाडू रिव्ह्यू घेत असतात. त्यामुळे DRS प्रणालीबाबत आयसीसीला पुन्हा एकदा विचार करावा, असे सचिनने म्हटले आहे. खास करुन अंपायर कॉलसंदर्भात त्याने नाराजी व्यक्त केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर आयसीसी नियमासंदर्भात काय विचार करणार हे पाहावे लागेल. यापूर्वी सचिनने फलंदाजांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करावी, असे सूचवले होते.  

बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीमध्ये निर्णय घेणं ज्यावेळी कठिण होतं त्यावेळी 'अंपायर्स कॉल' ही कनसेप्ट वापरली जाते. यामध्ये पंचांनी दिलेला निर्णय कामय ठेवला जातो. रिव्ह्यू वाचण्यात संघ यशस्वी ठरत असला तरी बऱ्याचदा काही संघाना याचा फटकाही बसतो. मेलबर्न विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला अंपायर कॉलचा मोठा फटका बसला. तर कांगारुंना फायदा झाला. अंपायर कॉलने दोघांना जीवदान मिळाले.  

AusvsInd : अन् मोठा मासा गळाला लागला

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकात जसप्रित बुमराहने  जोए बर्न्‍सविरोधात पायचित (LBW) अपील केले. अंपायरने त्याला नॉट आउट दिले. भारतीय संघाने यावेळी रिव्ह्यू घेतला. पण अंपायर कॉलमुळे बर्न्स नाबाद ठरला. मार्नस लाबुशेन विरोधातही असाच प्रकार घडला. अंपायरने नॉट आउट दिल्यानंतर अंपायर कॉलमुळे त्यालाही जीवदान मिळाले. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. भारतीय संघ चौथ्या दिवशी विजय मिळवण्यात यश मिळवणार की कांगारु सामना वाचवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या