AusvsInd Test : टीम इंडियाला जिथं खेळायचं नव्हतं ते शहर झालं लॉकडाऊन

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

आता ब्रिस्बेनमध्ये कठोर लॉकडाऊनचा नियम लागू करण्यात आला आहे. शुक्रवारपासून शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे चौथा आणि अखेरचा कसोटी सामन्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. 

India Tour Of Australia Brisbane Lockdown : ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या ब्रिस्बेनमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा सामना नियोजित आहे. याठिकाणी कसोटी सामना खेळण्यासंदर्भात अनेक चर्चा तिसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वीच रंगत आहेत. क्वारंटाईन नियमात शिथिलता करावी, अशी मागणी भारतीय संघाची होती, अशा बातम्या समोर आल्या.

त्यानंतर क्वीसलंड राज्य सरकारने ब्रिस्बेनमध्ये यायचे असेल तर जे नियम आहेत ते पाळावेच लागतील असा इशाराही भारतीय टीमला दिला. हे सर्व सुरु असताना आता ब्रिस्बेनमध्ये कठोर लॉकडाऊनचा नियम लागू करण्यात आला आहे. शुक्रवारपासून शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे चौथा आणि अखेरचा कसोटी सामन्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. 

AusvsInd : दिवसाअखेर पारडे पुन्हा कांगारुकडे झुकलं; स्मिथ-लाबुशेन डोकेदुखी वाढवणार?

ब्रिस्बेमध्ये एका स्थानिकामध्ये कोरोना विषाणुचा नवा प्रकार आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारपासून शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. क्वीसलंड राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ग्रेटर ब्रिसबेन परिसरात 11 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून कसोटी नियोजित आहे. 

यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंमध्ये क्वारंटाईनच्या नियमामुळे निराशा असल्याचे समोर आले होते. भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये खेळण्यासाठी गेल्यानंतर क्वारंटाईन होण्यास तयार नसल्याचे बोलले गेले. यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका सांगितलेली नाही. पण तिसरा कसोटी सामना ज्या मैदानात होत आहे त्याच मैदानात तिसरा सामना खेळण्यास संघाने तयारी दर्शवल्याचीही चर्चा होती. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासंदर्भात दोन्ही क्रिकेट मंडळ काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या