ICC World Test Championship:टीम इंडियाची सुधारणा; पराभूत होऊनही ऑस्ट्रेलिया अव्वल 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे नाईट कसोटी सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा बदला भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात भरून काढला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे नाईट कसोटी सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा बदला भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात भरून काढला आहे. दोन्ही देशांमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना चांगलाच रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येत असलेली चार सामन्यांची मालिका आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत होत आहे. आणि भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबल मध्ये मोठा बदल झाला आहे. न्यूझीलंडला मागे भारतीय संघ दुसर्‍या स्थानावर गेला आहे. 

AusvsInd : पिंक बॉल विसरा; अजिंक्यच्या शिलेदारांनी कांगारुंना दिला 'रेड...

मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली खेळी केल्याने हा सामना चौथ्या दिवशीच आपल्या खिशात घातला. तर भारतासोबत झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत नुकसान झेलावे लागले आहे. मात्र त्यानंतर देखील ऑस्ट्रेलियाचा संघ या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर भारताच्या संघाने एका स्थानाची आगेकूच करत दुसरे स्थान काबीज केले आहे. आणि दुसऱ्या स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरलेला आहे. याशिवाय न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सध्या चालू असून, या मालिकेतील दुसऱ्या कसोटीचा शेवटचा दिवस उद्या आहे. आणि त्यानंतर पुन्हा न्यूझीलंडच्या आकडेवारीत बदल होऊ शकतात.     

AusvsInd Record : अजिंक्य दिग्गजांच्या पक्तींत; टीम इंडियाची द. आफ्रिकेसोबत...

आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिप टेबल मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने 77 टक्के विजय मिळवले असल्याने कांगारूंचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 72 टक्के विजय मिळवलेले आहेत. आणि भारतीय संघ आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर न्यूझीलंडच्या विजयाची टक्केवारी 62 आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. व 60 टक्क्यांसह इंग्लंडचा संघ चौथ्या आणि 39 टक्क्यांसह पाकिस्तानचा संघ पाचव्या नंबरवर आहे. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात आला. त्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारीला आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेन मध्ये खेळण्याचे नियोजन आहे. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यावर कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियात काही भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकारणांमुळे स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे.   


​ ​

संबंधित बातम्या