AUSvsIND : T20 मालिकेत भारत ठरणार वरचढ ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाकडे खेळाडूंचे फार कमी पर्याय उपलब्ध असल्याचे जाणवले होते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाकडे खेळाडूंचे फार कमी पर्याय उपलब्ध असल्याचे जाणवले होते. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांकडून म्हणावी तशी कामगिरी झाली नसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र उद्यापासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरण्याची शक्यता आहे. 

भारतीय संघातील नवख्या गोलंदाजाची सेहवागने केली प्रशंसा 

ऑस्ट्रेलियासोबतची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताला 2 - 1 ने गमवावी लागली. परंतु टी 20 मालिकेत भारतीय संघ दमदार कामगिरी करू शकतो. टी 20 मध्ये भारताचा अतिशय संतुलित संघ आहे. कोरोना साथीच्या आधी, भारताने न्यूझीलंडला पाच सामन्यांच्या मालिकेत पराभूत केले होते. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा टी नटराजन यांच्यामुळे भारताची गोलंदाजी फळी संतुलित आणि दमदार असणार आहे. 

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने चांगली गोलंदाजी केली होती. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संधी मिळालेल्या टी नटराजनने प्रभावी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे टी 20 सामन्यात टी नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला अपयश आल्याचे दिसले. त्यामुळे त्याला आगामी मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान असणार आहे. 

''आजपर्यंत अशा अफलातून गोलंदाजांचा सामना केला नव्हता''  

त्यानंतर फलंदाजीचा विचार केल्यास एकदिवसीय सामन्यांमध्ये पाचव्या स्थानावर आलेला केएल राहुल टी 20 सामन्यात शिखर धवनसोबत सलामीला उतरण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये या दोघांनीच भारतीय डावाची सुरवात केली होती. त्यामुळे संघाला याचा फायदा देखील झाला होता. याव्यतिरिक्त एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला कोणतीही मोठी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला आगामी सामन्यांमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर , टी. नटराजन.

ऑस्ट्रेलियाचा संघ : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन एगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवुड, मोइसेस हेनरिक्स, मार्नस लबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सायम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डी. आर्ची शॉर्ट, अ‍ॅडम झम्पा.      


​ ​

संबंधित बातम्या