रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध लढत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख खेळाडूंना टार्गेट करण्यात वाक्‌बगार असलेले ऑस्ट्रेलिया या सराव सामन्यात रहाणे, पुजारा यांना फॉर्म न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतील.हा सराव सामना तीन दिवसांचाच असल्यामुळे साधारणतः एकाच डावात फलंदाजी मिळू शकते. या संधीचा फायदा रहाणे, पुजारा, पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल कसे घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या ट्‌वेन्टी-२० सामन्यात खेळणार आहे. त्याच वेळी कसोटीसाठी अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वाखाली दुसरा संघ सराव सामन्यासाठी प्रथमच मैदानात उतरणार आहे. कसोटी मालिका सुरू व्हायला अजून वेळ असला, तरी निव्वळ कसोटी सामने खेळणारे खेळाडूही बायो बबल वातवरणात राहावे म्हणून ते आयपीएल संपल्यानंतर थेट अमिरातीतून ऑस्ट्रेलियात दाखल झाले होते.

रवींद्र जडेजाची उणीव कोण भरणार? फलंदाजाकडून अपेक्षा

मर्यादित षटकांसाठी संघात असलेल्या खेळाडूंना संधी मिळाली असली तरी अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहार, पृथ्वी शॉ यांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. उद्या सामन्यासाठी ते प्रथमच मैदानात उतरतील.
विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतणार असल्यामुळे रहाणे, पुजारा यांच्यावरची जबाबदारी दुप्पट होणार आहे. त्यामुळे सराव सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Record : 3 सामन्यांची T20 मालिका विराटने कधीच गमावलेली नाही​

सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख खेळाडूंना टार्गेट करण्यात वाक्‌बगार असलेले ऑस्ट्रेलिया या सराव सामन्यात रहाणे, पुजारा यांना फॉर्म न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतील.हा सराव सामना तीन दिवसांचाच असल्यामुळे साधारणतः एकाच डावात फलंदाजी मिळू शकते. या संधीचा फायदा रहाणे, पुजारा, पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल कसे घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
गोलंदाजांवर लक्ष
कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमरा, महम्मद शमी आणि नवदीप सैनी हे प्रमुख गोलंदाज असले तरी उमेश यादव, महम्मद सिराज हे पर्यायी गोलंदाज सराव सामन्यात कशी कामगिरी करतात यावर संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल.
 
​ ​

संबंधित बातम्या