AusvsInd: पहिल्या दिवशी डीन जोन्स यांना अशी वाहिली गेली श्रद्धांजली (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

जोन्स यांचे सप्टेंबरमध्ये मुंबईती हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. इंडियन प्रीमियर लीगच्या समालोचनासाठी ते भारतात आले होते. जोन्स यांच्या घरच्या मैदानवरील कसोटी सामन्यावेळी त्यांना खास श्रद्धांजली वाहण्यात आली.

A special moment at the MCG in memory of Dean Jones : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात रंगला आहे. बॉक्सिंग डेच्या दिवशी खेळाला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डिन जोन्स यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डिन जोन्स यांच्या पत्नी, मुली आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्ग क्रिकेटर एलन बॉर्डरही उपस्थितीत होते.  

जोन्स यांच्या कुटुंबिय आणि ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटर बॉर्डर यांनी टी ब्रेकमध्ये आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. बॉर्डर, जोन्स यांच्या पत्नी जेन त्यांची मुलगी आगस्टा आणि फोबे यांनी वडिलांची ग्रीन बॅगी कॅप, सनग्लास आणि काकाबूराची बॅट हातात घेऊन मैदानाची फेरी मारली. दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी जवळपास 30000 प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्यांनी ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूला श्रद्धांजली वाहिली. 

IND vs AUS - 2nd Test, Day 1 - 36 च्या आकड्याचा कमालीचा योगायोग!

जोन्स यांचे सप्टेंबरमध्ये मुंबईती हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. इंडियन प्रीमियर लीगच्या समालोचनासाठी ते भारतात आले होते. जोन्स यांच्या घरच्या मैदानवरील कसोटी सामन्यावेळी त्यांना खास श्रद्धांजली वाहण्यात आली. जोन्स यांच्यासोबत अखेरच्या क्षणी बराच काळ राहिलेल्या ब्रेटलीने या मेलबर्नच्या मैदानातील श्रद्धांजली ही त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी एकदम योग्य वाटते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या