विराटच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी अस्थिर: पाँटिंग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांत विराट कोहलीची अनुपस्थितीचा (फलंदाज आणि कर्णधार) भारतीय संघाला मोठा परिणाम होईल, त्यामुळे इतर खेळाडूंवर त्याचे दडपण येईल. अजिंक्‍य रहाणे कर्णधार होण्याची शक्‍यता आहे, पण या जबाबदारीचे त्याच्यावर दडपण येईल आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा प्रश्‍न भारतीय संघासमोर असेल, असे पाँटिंग म्हणतो. 

सिडनी : कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाविरुद्ध ‘मानसिक खेळी’ करण्याच्या ऑस्ट्रेलियन शर्यतीत आता त्यांचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग उतरला आहे. विराट कोहली संघात असताना भारतीय संघ निश्‍चितच वरचढ आहे, परंतु तो माघारी गेल्यानंतर भारतीय संघ दुबळा होईल, असा अंदाज पाँटिंगने व्यक्त केला आहे. 
संपूर्ण क्रिकटविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत पहिला सामना खेळल्यानंतर विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी मायदेशी येणार आहे. भारतीय संघात घडणाऱ्या याच घडामोडींचा ऑस्ट्रेलियन भारतीय संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, आता त्यात पाँटिंगने उडी घेतली आहे.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांत विराट कोहलीची अनुपस्थितीचा (फलंदाज आणि कर्णधार) भारतीय संघाला मोठा परिणाम होईल, त्यामुळे इतर खेळाडूंवर त्याचे दडपण येईल. अजिंक्‍य रहाणे कर्णधार होण्याची शक्‍यता आहे, पण या जबाबदारीचे त्याच्यावर दडपण येईल आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा प्रश्‍न भारतीय संघासमोर असेल, असे पाँटिंग म्हणतो. 

AusvsInd : हिटमॅनच्या फिटनेसची कसोटी; NCA त सुरुय कसून सराव

विराट कोहली मायदेशी परतल्यावर भारतीय संघ संभ्रमावस्थेत जाईल. पहिल्या कसोटीत असणारी फलंदाजीची क्रमवारी बिघडली जाईल, सलामीला कोणी खेळायचे, असा प्रश्‍न निर्माण होईल. भारताकडे जसप्रित बुमरा, महम्मद शमी त्यांच्या साथीला उमेश यादव, नवदीप सैनी किंवा महम्मद सिराज असे वेगवान गोलंदाज असले तरी फलंदाजीबाबत ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय संघासमोरच अधिक प्रश्‍न असतील, असा दावा पाँटिंगने केला आहे. 

बुमरा-शमीवरचा ताण कमी करणार

पाँटिंग भारतीय फलंदाजीबाबत प्रश्‍न उपस्थित करत असला तरी ऑस्ट्रेलियातही कोणाला स्थान द्यायचे, असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. सलामीला डेव्हिड वॉर्नरसह ज्यो बर्न्स खेळायचा, परंतु आता विल पुकोवस्की आणि कॅमेरुन ग्रीन असे नवोदित संघात आलेले आहेत; परंतु वॉर्नरसह बर्न्सला संधी द्यावी, असे मत पाँटिंगने व्यक्त केले. शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत पुकोवस्कीने सलग दोन द्विशतके केलेली आहेत.

​ ​

संबंधित बातम्या