AusvsInd : हिटमॅनच्या फिटनेसची कसोटी; NCA त सुरुय कसून सराव

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या सुरुवातीला निवडलेल्या ताफ्यात रोहित शर्माचा समावेशच करण्यात आला नव्हता. पण मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरल्यानंतर त्याच्या निवडीसंदर्भात शंका निर्माण झाली होती. अखेर नव्याने जाहीर केलेल्या संघात रोहित शर्माला स्थान मिळाले. मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला संधी मिळाली नसली तरी कसोटी मालिकेत तो मैदानात उतरणार आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माने बंगळुरु येथील राष्ट्रीय अकादमीत सरावाला सुरुवात केली आहे.  भारतीय संघ 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात करेल. त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका दोन्ही देशांत रंगणार असून चार कसोटी सामन्याच्या मालिकेने मोठ्या दौऱ्याची सांगता होणार आहे. 

दुखापतीमुळे रोहित शर्मा युएईत रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील काही सामन्याला मुकला होता. शेवटच्या साखळी सामन्यात मैदानात उतरत त्याने फिट असल्याचे संकेत दिले. फायनलमध्ये त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र 100 टक्के फिट नसल्याचे कारण देत बीसीसीआयने त्याला केवळ कसोटी सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या सुरुवातीला निवडलेल्या ताफ्यात रोहित शर्माचा समावेशच करण्यात आला नव्हता. पण मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरल्यानंतर त्याच्या निवडीसंदर्भात शंका निर्माण झाली होती. अखेर नव्याने जाहीर केलेल्या संघात रोहित शर्माला स्थान मिळाले. मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला संधी मिळाली नसली तरी कसोटी मालिकेत तो मैदानात उतरणार आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार असून रोहित शर्माच्या खांद्यावरील जबाबदारी आणखी वाढणार आहे. यादरम्यान कसोटी संघाचा  उपकर्णधार अजिंक्य कार्यवाहू कर्णधारपद भूषविणार की रोहित शर्माला संधी मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
 
​ ​

संबंधित बातम्या