AUS vs IND : मास्टर ब्लास्टर म्हणाला; टीम इंडिया सावधान!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

वेगवेगळ्या काळातील मालिकेची तुलना करणे योग्य ठरणार नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघात फिरकीच्या ताकदीसह चेंडू स्विंग करण्याची उत्तम क्षमता असणारे गोलंदाज आहेत. बुमराह आणि अश्विनच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजी मजबूत वाटते, असेही सचिनने म्हटले आहे.  

India vs Australia Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानातील डे नाइट कसोटी सामन्याने दोन्ही देशातील बहुचर्चित मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला सावध केले आहे. ऑस्ट्रेलिया ताफ्यातील तीन खेळाडू भारतीय संघाची डोकेदुखी वाढवू शकतात, असा अंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केल आहे. 

 यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापेक्षा आगामी दौऱ्यातील कांगारुंचा संघ अधिक मजबूत आहे. स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नरचा कमबॅक संघाची ताकद वाढवणारा आहे. मार्नस लाबुशेनही डोकेदुखी वाढवू शकतो. त्यामुळे या खेळाडूंविरोधात चांगली रणनिती आखायला पाहिजे, असा सल्ला सचिनने टीम इंडियाला दिलाय.  

पाहुण्या टीम इंडियाला रोखण्यासाठी कांगारुंनी आखलाय खास 'गेम प्लॅन'

 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेत हे तिन्ही खेळाडू संघाचा भाग नव्हते. लाबुशनने कसोटीत पदार्पण केले नव्हते. तर स्मिथ-वॉर्नर चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांना मालिकेला मुकावे लागले होते. ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली होती.  

ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन झाल्यानंतरही रोहितच्या फिटनेस 'टेस्ट'चा सिलसिला सुरुच राहणार!

वेगवेगळ्या काळातील मालिकेची तुलना करणे योग्य ठरणार नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघात फिरकीच्या ताकदीसह चेंडू स्विंग करण्याची उत्तम क्षमता असणारे गोलंदाज आहेत. बुमराह आणि अश्विनच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजी मजबूत वाटते, असेही सचिनने म्हटले आहे. यापूर्वी वनडे मालिकेतही सचिनने स्मिथला पाचव्या स्टंम्पवर खेळवण्याचा सल्ला दिला होता. मात्र पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सचिनने सांगितलेला मंत्राकडे दुर्लक्ष केलं. परिणामी स्मिथने बॅक टू बॅक दोन शतकं झळकावली. आणि टीम इंडियाला मालिका गमवावी लागली होती. 


​ ​

संबंधित बातम्या