विराटसोबत खेळताना फ्लॉप ठरलेल्या फिंचचा हिट शो!

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका, तीन सामन्याची टी-20 सह चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सिडनीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करुन हा दौरा भारतासाठी सहज आणि सोपा नाही, याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघ तीन प्रकारात कशी कामगिरी करुन परतणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

युएईमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या फिंचने सिडनीमध्ये सुरु असलेल्या सामन्यात दमदार शतकी खेळी नोंदवली. आयपीएलमध्ये विराटसोबत खेळताना फ्लॉप ठरलेल्या फिंचने देशाकडून खेळताना विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वॉर्नर आणि फिंचने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी करत भारतीय प्रमुख गोलंदाजांचे खांदे पाडले. डेविड वॉर्नर 69 धावांवर बाद झाला. शमीने त्याची विकेट घेतली.

वॉर्नर परतल्यानंतर फिंचने स्मिथच्या साथीनं संघाचा डाव पुढे नेला. त्याने आपल्या आतंरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले. वनडेमध्ये 153 ही फिंचची सर्वोच्च खेळी आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने 124 चेंडूत 114 धावांची खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 2 षटकार खेचले. बुमराहने यष्टिमागे उभा असलेल्या केएल राहुलकरवी त्याला झेलबा केले. मात्र बाद होण्यापूर्वी फिंचने संघाचा मजबूत स्थितीत नेऊन ठेवले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका, तीन सामन्याची टी-20 सह चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सिडनीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करुन हा दौरा भारतासाठी सहज आणि सोपा नाही, याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघ तीन प्रकारात कशी कामगिरी करुन परतणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत फिंच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातून खेळला होता. पण त्याला या स्पर्धेत नावाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी बंगळुरुला स्पर्धेत शेवटपर्यंत तग धरता आला नव्हता. फिंचने एका अर्धशतकाच्या मदतीने 12 सामन्यात 268 धावा केल्या होत्या. पण वनडेत त्याने धमाकेदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. 

​ ​

संबंधित बातम्या