AUSvsIND Record : टीम इंडियातील गोलंदाजांच्या फ्लॉपशोची 'पंचमी'

सकाळ ऑनलाईन
Sunday, 29 November 2020

पहिला सामना गमावल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक पुन्हा एकदा गमावली. फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्या सामन्याप्रमाणेच पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पुन्हा सार्थ ठरला. वॉर्नर-फिंच जोडीनं पहिलल्या विकेटसाठी 142 धावांची खेळी केली. 

Australia vs India, 2nd ODI : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इडिया सिडनीतील दुसऱ्या वनडेतही बॅकफूटवर खेळताना दिसत आहे. पहिला सामना गमावल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक पुन्हा एकदा गमावली. फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्या सामन्याप्रमाणेच पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पुन्हा सार्थ ठरला. वॉर्नर-फिंच जोडीनं पहिलल्या विकेटसाठी 142 धावांची खेळी केली. 

-पहिल्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी धमाकेदार कामगिरी करत भारतीय गोलंदाजांना लवकर विकेट दिली नव्हती. पहिल्या सामन्यात पहिल्या पावर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने बिन बाद   51 धावा केल्या होत्या. 

AusvsIND : "संघाच्या मदतीसाठी आता विराटने गोलंदाजीही करावी"

-भारती गोलंदाजांनी दुसऱ्या वनडेतही निराश केले. पहिल्या पावर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियन सलामी जोडीन 59 धावांची लयलुट केली. यात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही.  

-यापूर्वी माउंट मांगुनईमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना पावर प्लेमध्ये  65 धावा खर्च करुन एकही विकेट मिळवता आली नव्हती.  

-ऑकलँडच्या मैदानातही न्यूझीलंड सलमीवीरांनी भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले होते. पॉवर प्लेमध्ये 52 धावा खर्च करुन टीम इंडियाला सलामी जोडी फोडण्यात अपयश आले होते.  

AusvsIND : "संघाच्या मदतीसाठी आता विराटने गोलंदाजीही करावी"

-हॅमिल्‍टनच्या मैदानात न्यूझीलंडने बिन बाद  54 धावा केल्या होत्या. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना सिडनीच्या मैदानात सुरु आहे. ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी आपल्यातील ताकद दाखवून देत भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवलं असून पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत असून भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर उभे केले आहे.  

 


​ ​

संबंधित बातम्या