IND VS AUS - भारतीय गोलंदाजाने स्पॉट फिक्सिंग केल्याची शंका; शेन वॉर्न झाला ट्रोल

टीम ई सकाळ
Monday, 18 January 2021

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. भारतीय खेळाडूवर अप्रत्यक्षपणे स्पॉट फिक्सिंगचा आरोप केल्याचं म्हणत नेटिझन्सनी हल्लाबोल केला आहे.

शेन वॉर्ननं भारताचा गोलंदाज टी नटराजनच्या नो बॉलवरून कमेंट्रीवेळी काही कमेंट केल्या. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियातील एका चॅनेलवर कमेंट्री करताना टी नटराजनने टाकलेल्या नो बॉलच्या संख्येबाबत शंका व्यक्त केली. यानंतर सोशल मीडियावर वॉर्न ट्रोल झाला.

नटराजनने ब्रिस्बेन कसोटीत 7 नो बॉल टाकले. या चेंडूबाबत शेन वॉर्नने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजीवेळी कमेंट्री करताना शेन वॉर्नने अॅलन बोर्डर यांना सांगितलं की, नटराजनने जे 7 नो बॉल टाकले आहेत त्यातील 5 पहिल्या चेंडूवर होते. 

मला नटराजनच्या गोलंदाजीत एक वेगळी गोष्ट दिसली. नटराजनने 7 नो बॉल टाकले. यातील पाच नो बॉल पहिल्या चेंडूवर होते आणि त्याचा पाय क्रीजच्या खूप बाहेर होता. आम्ही सर्वांनी नो बॉल टाकले आहेत आहेत पण 5 नो बॉल पहिल्या चेंडूवर टाकणं हे नक्कीच वेगळं आहे.

शेन वॉर्नने अप्रत्यक्षपणे टी नटराजनची तुलना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरसोबत केली आहे. त्याने 2010 मध्ये लॉर्डस् कसोटीत अशाच पद्धतीने नो बॉल टाकले होते. मोहम्मद आमिर यानंतर स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. 


​ ​

संबंधित बातम्या