गोलंदाजांच्या धुलाईनंतर सोशल मीडियावर रंगली विराट-रोहितची चर्चा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 29 November 2020

दुसऱ्या वनडेतील गोलंदाजांच्या निराशजनक कामगिरीनंतर रोहित शर्मा ट्रेंडिगमध्ये आलाय. सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची तुलना सुरु झाली आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज ज्यावेळी भारतीय गोलंदाजावर तुटून पडतात त्यावेळी रोहित शर्मा गोलंदाजांना धीर देण्याचे काम करतो. तर विराट कोहली चेहरा पाडून एका कोपऱ्यात उभा राहतो, अशा आशयाच्या काही पोस्ट सोशल मीडियावर दिसून येत आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली. स्मिथची शतकी खेळीसह वॉर्नर, फिंच, लाबुशेन आणि मॅक्सवेलनं अर्धशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजां प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेपेक्षा अधिक धावा करत भारतीय संघासमोर धावांचा डोंगर उभारला आहे. सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला 390 धावांचे लक्ष्य मिळाले.

दुसऱ्या वनडेतील गोलंदाजांच्या निराशजनक कामगिरीनंतर रोहित शर्मा ट्रेंडिगमध्ये आलाय. सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची तुलना सुरु झाली आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज ज्यावेळी भारतीय गोलंदाजावर तुटून पडतात त्यावेळी रोहित शर्मा गोलंदाजांना धीर देण्याचे काम करतो. तर विराट कोहली चेहरा पाडून एका कोपऱ्यात उभा राहतो, अशा आशयाच्या काही पोस्ट सोशल मीडियावर दिसून येत आहेत.

Image

काहीजण आयपीएलमधील रोहित शर्माच्या कामगिरीचा दाखला देत विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत. काहींनी रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी दाखवून देत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितशिवाय जाणे महागात पडत असल्याच्या पोस्ट देखील शेअर करत आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 78 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

Image

जगातील अन्य फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. पण दुखापतीचे कारण देत बीसीसीआयने त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांत संधी दिली नव्हती. दुखापतग्रस्त असताना रोहित आयपीएल कसा खेळतो? असा प्रश्न उपस्थितीत झाल्यानंतर रोहित शर्माची कसोटीत वर्णी लागली. पण या मालिकेतील दोन कसोटीलाही तो मुकण्याची शक्यता असून तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. 

​ ​

संबंधित बातम्या