ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का जायबंदी; मैदान सोडून जावे लागले हॉस्पिटलात

सकाळ ऑनलाईन
Sunday, 29 November 2020

भारताच्या डावातील चौथ्या षटकात वॉर्नरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. शिखर धवनने लगावलेला फटका अडवताना त्या डाइव मारली होती. फलंदाजीमध्ये वॉर्नरने 77 चेंडूत 83 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या वनडेशिवाय पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. तो सध्या दमदार कामगिरी करत असल्यामुळे भारताविरुद्धच्या आगामी सामन्यात तो पुन्हा खेळावा, अशीच संघ व्यवस्थापन प्रार्थना करत असेल.  

India vs Australia 2nd ODI भारता विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात संघाला दमदार सुरुवात करुण देणारा सलामीवीर डेविड वॉर्नरला क्षेत्ररक्षणावेळी मैदान साडावे लागले. सिडनीच्या मैदानात एक चेंडू अडवताना वॉर्नला दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर त्याला चालणेही अशक्य झाले होते. मैदानातून बाहेर नेल्यानंतर त्याला एक्स-रे स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याची दुखापत गंभीर असेल तर टीमला याचा मोठा फटका बसू शकतो.  

भारताच्या डावातील चौथ्या षटकात वॉर्नरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. शिखर धवनने लगावलेला फटका अडवताना त्या डाइव मारली होती. फलंदाजीमध्ये वॉर्नरने 77 चेंडूत 83 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या वनडेशिवाय पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. तो सध्या दमदार कामगिरी करत असल्यामुळे भारताविरुद्धच्या आगामी सामन्यात तो पुन्हा खेळावा, अशीच संघ व्यवस्थापन प्रार्थना करत असेल.  

AUSvsIND Record : टीम इंडियातील गोलंदाजांच्या फ्लॉपशोची 'पंचमी'

पहिल्या वनडे सामन्यात  वॉर्नरने 76 चेंडूत 69 धावांची खेळी केली होती. खेळीत सातत्य कायम राखत दुसऱ्या सामन्यातही त्याने कर्णधारासोबत आक्रमक खेळ दाखवला. या सामन्यात तो शतकाला गवसणी घालेल, असे वाटत असताना शमीनं त्याच्या खेळीला ब्रक लावला. चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडेत 389 धावांचा डोंगर रचत भारतासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 

​ ​

संबंधित बातम्या