IND vs AUS: अन् कांगारुंना रडवणाऱ्या अश्विनचे डोळे बायकोच्या ट्विटनं पाणावले

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

पाचव्या दिवशी सामना हा अनिर्णित राहिल याचा विचार कोणीही केला नव्हता. अर्धा संघ तंबूत परल्यानंतर अश्विन-विहाराने भारतीय संघाचा डाव ज्या पद्धतीने सावरला त्याला तोड नव्हती.

सिडनीच्या मैदानात रंगलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश आले आहे. सलामीवीर शुभमन गील आणि रोहित शर्मा या सलामवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, चौथ्या दिवसाअखेर दोन्ही सलामीवीर बाद झाल्यामुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं कलला. त्यात पाचव्या दिवशीच्या सुरुवातीसच अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी फिरला. टीम इंडियाची डोकेदुखी वाढत असताना पंत-पुजारा जोडीनं सामना पुन्हा बरोबरीत आणला. ही दोघेही बाद झाल्यानंतर अश्विन-विहारी जोडीनं संघाचा पराभव टाळला.

पाचव्या दिवशी सामना हा अनिर्णित राहिल याचा विचार कोणीही केला नव्हता. अर्धा संघ तंबूत परल्यानंतर अश्विन-विहाराने भारतीय संघाचा डाव ज्या पद्धतीने सावरला त्याला तोड नव्हती. या सामन्यात रविंद्र जडेजा अधिच दुखापतग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. सामना सुरु असताना हनुमा विहारीही स्नायूच्या दुखापतीने त्रस्त दिसला. त्यानंतर आता अश्विननेही वेदना सहन करत पेनच्या संघाच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतल्याचे समोर आले आहे. 

The man went to bed last night with a terrible back tweak and in unbelievable pain. He could not stand up straight when he woke up this morning. Could not bend down to tie his shoe laces. I am amazed at what @ashwinravi99 pulled off today.

— Prithi Ashwin (@prithinarayanan) January 11, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनसोबत असणाऱ्या त्याच्या पत्नीने केलेल्या ट्विटनंतर अश्विनलाही पाठदुखीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. अश्विनची पत्नी प्रिती हीने ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तिने ट्विटमध्ये लिहिलंय की, काल रात्री अश्विनला पाठिच्या दुखण्याने चांगलाच त्रास झाला होता. सकाळी त्याला नीट उभेही राहता येत नव्हते. या परिस्थितीत असताना त्याने मैदानात जो खेळ दाखवला त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे, असा उल्लेखही तिने ट्विटमध्ये केलाय. याशिवाय आता मला पॅकिंगसाठी मदत कोण करणार? असा प्रश्नही त्याला विचारला आहे.  पत्नीच्या या ट्विटने अश्विन भावूक झाला असून ट्विटच्या माध्यमातून त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट पाहून डोळ्यात पाणी आले, असे त्याने म्हटलंय.  


​ ​

संबंधित बातम्या