चहलनं मर्यादा ओलांडली; मॅक्सवलनं उठवला फायदा!

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 December 2020

13 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मॅक्सवेल आउट झाला पण नो बॉल असल्यामुळे त्याला आपली खेळी पुढे नेण्याची संधी मिळाली. चहलच्या हे षटक चांगलेच महागात पडले होते.

एक नो बॉल किती महागडा ठरु शकतो, याचा अनुभव भारतीय संघाने पुन्हा एकदा घेतला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात युजवेंद्र चहलच्या नो बॉलमुळे मॅक्सवेलला जीवदान मिळाले. त्यानंतर मॅक्सवेलनं 32 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले. 54 धावांवर त्याला टी. नटराजनने बोल्ड केले.

13 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मॅक्सवेल आउट झाला पण नो बॉल असल्यामुळे त्याला आपली खेळी पुढे नेण्याची संधी मिळाली. चहलच्या हे षटक चांगलेच महागात पडले होते. 11 धावा लुटल्यानंतर मॅक्सवेलनं रिव्हर्स स्वीप फटका खेळला. लोकेश राहुलनं कॅचही कव्हर केला. पण फ्रंटफूटचा नो बॉल दिल्यामुळे मॅक्सवेल  नाबाद ठरला. फ्रि हिटला स्ट्राईक मॅथ्यू हेडकडे आले आणि त्याला मात्र याचा फायदा घेता आला नाही. एकेरी धावेवर त्याला समाधान मानावे लागले. 

टी नटराजन एक निर्भिड गोलंदाज; वाचा कोण म्हणाले

हिंदी चॅनेलवर समालोचन करणाऱ्या अजय जडेजा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. बॉल रिलीज करण्यापूर्वी चहलचा पाय क्रिजबॉहेर होता. मात्र त्याने बॉल फेकण्यापूर्वी पाय आत घेतल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. तिसऱ्या पंच हा निर्णय देत असतील तर त्यांनी यावर विचार करायला हवा होता, असे जडेजा यांनी म्हटले आहे. नियमानुसार तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय योग्यच आहे. याशिवाय मॅक्सवेलला आणखी एक जीवदान मिळाले. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मोठी फटकेजी करण्याच्या नादात मॅक्सवेलने हवेत चेंडू टोलावला. दीपक चाहर बॉलपर्यंत पोहचला पण त्याला झेल टिपण्यात अपयश आले. 


​ ​

संबंधित बातम्या