AUSvsIND : पृथ्वी, शुभमन- साहाचा भोपळा; अजिंक्यचा शतकी सराव

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

वृद्धिमान साहालाही खाते उघडता आले नाही. आर अश्विन अवघ्या 5 धावांची भर घालून चालता झाला. त्यानंतर रहाणेनं कुलदीप यादवच्या साथीनं 69 धावांची खेळी केली.

India Tour Of Australia Ajinkya Rahane Century :  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू सराव सामन्यासाठी मैदानात उतरले आहेत. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात भारतीय अ संघाची कमान सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली. दुसरीकडे चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.  

अजिंक्य रहाणेचं शतक आणि पुजाराने केलेल्या 54 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात भारताने 8 बाद  237 धावा केल्या आहेत. रहाणेनं 108 धावांची दमदार खेळी केली.  त्याने 228 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या असून यात 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.  

AUSvsIND : विराटनं कॅच सोडला तरी वेडला जावे लागले माघारी - VIDEO​

युवा ब्रिगेडचा फ्लॉप शो 
पहिल्या दिवशीच्या पहिल्या डावात भारतीय युवा खेळाडूंनी निराशजनक कामगिरी केली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. भारताने तिसरी विकेटही लवकर गमावली. हनुमा विहारी 15 धावा करुन तंबूत परतला. 3 बाद 40 अशी धावसंख्या असताना रहाणेनं संघाचा डाव सावरला. चेतेश्वर पुजारा आणि रहाणेनं डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. पुजाराने 140 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 54 धावा केल्या.

वृद्धिमान साहालाही खाते उघडता आले नाही. आर अश्विन अवघ्या 5 धावांची भर घालून चालता झाला. त्यानंतर रहाणेनं कुलदीप यादवच्या साथीनं 69 धावांची खेळी केली.


​ ​

संबंधित बातम्या