AusvsIND : "संघाच्या मदतीसाठी आता विराटने गोलंदाजीही करावी"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 28 November 2020

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विराट म्हणाला होता की, आमच्या ताफ्यात स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि मॅक्सवेल (Glenn Maxwell) सारख्या खेळाडूंची उणीव भासते आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात केवळ  अष्टपैलूच्या रुपात केवळ जडेजा संघात आहे. 27 वर्षीय हार्दिक पांड्या पाठिच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकत नाही.  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. पहिल्या पराभवानंतर विराट कोहलीनं  ऑस्ट्रेलियन संघात टीम इंडियापेक्षा उत्तम पर्यायी गोलंदाज उपलब्ध असल्याचे बोलून दाखवले. याच अनुषंगाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी  (Tom Moody) यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजी करण्याचा सल्ला दिलाय.

विराट-रोहितमधील 'अबोला' बरा नव्हे; नेहराचा यॉर्कर

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विराट म्हणाला होता की, आमच्या ताफ्यात स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि मॅक्सवेल (Glenn Maxwell) सारख्या खेळाडूंची उणीव भासते आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात केवळ  अष्टपैलूच्या रुपात केवळ जडेजा संघात आहे. 27 वर्षीय हार्दिक पांड्या पाठिच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकत नाही.  

सिडनीच्या मैदानात भारतीय संघाला अतिरिक्त गोलंदाजांची उणीव भासली होती. परिणामी ऑस्ट्रेलियाने  374 धावा केल्या होत्या.  टॉम मूडी ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, ऑस्ट्रेलियाचा संघ संतुलित आहे. संघात पर्यायी गोलंदाजही उपलब्ध आहेत. विराट कोहलीला आता स्वत: गोलंदाजी करुन संघाच्या मदतीला धावावे, असे त्यांनी म्हटले आहे. विराट त्यांचा सल्ला कितपत मनावर घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

​ ​

संबंधित बातम्या