AUSvsIND :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारताला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारताला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. कोरोनाच्या संकटानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताला गमवावा लागला असून, ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

INDvsAUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हार्दिकने रचला इतिहास  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व  प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नरने 69 धावांचे योगदान देऊन माघारी फिरला. आणि त्यानंतर  फिंचने कर्णधाराला साजेसा खेळ करत 114 धावांचे योगदान दिले. तर स्मिथने आक्रमक खेळाचा नमुना पेश करत 66 चेंडूत 105 धावा कुटल्या. अखेरच्या षटकात मॅक्सवेलने 19 चेंडूत 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या चौघांच्या दमदार खेळीच्या जोरावर प्रथम फंलदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 6 बाद 374 धावा करत भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 375 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात म्हणावी तशी झाली नाही. मयांक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने संघाची पडझड रोखली. मयांक अग्रवाल (22),  विराट कोहली (21), श्रेयस अय्यर (2) आणि केएल राहुल (12) हे बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ऍडम झम्पाने शिखर धवनला स्टार्ककडे झेलबाद केले. यांनतर हार्दिक पांड्याला देखील ऍडम झम्पाने स्टार्ककडे झेलबाद केले. शिखर धवनने 86 चेंडूत 74 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 76 चेंडूत 90 धावांची खेळी केली. मात्र फक्त दहा धावांनी हार्दिक पांड्याचे शतक हुकले.    

शिखर धवन आणि हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर आलेला रवींद्र जडेजा देखील अवघ्या 25 धावांवर बाद झाला. त्याला सुद्धा  ऍडम झम्पाने बाद केले. व त्यानंतर भारतीय संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला.      

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. बुमराह, नवदीप सैनी आणि चहल यांना प्रत्येकी एक-एक बळी मिळवता आले. तर ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याने 5.40 च्या सरासरीने 54 धावा देऊन चार बळी घेतले. यानंतर जोश हेझलवूडने आजच्या सामन्यात तीन बळी टिपले. व मिशेल स्टार्कने एक विकेट घेतली.        


​ ​

संबंधित बातम्या