AUSvsIND कांगारुंचा वचपा काढला; पांड्याच्या षटकाराने भारताचा 'विराट' मालिका विजयी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

2017 पासून विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील विजय पंरपरा कायम ठेवली आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही टी-20 मालिका गमावलेली नाही.

Australia vs India 2nd T20I सलामीवीर शिखर धवनचे अर्धशतक (52) आणि अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या-अय्यर जोडीनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. पांड्याच्या षटकारानं भारताने मालिका 2-0 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. या विजयासह 2017 पासून विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील विजय पंरपरा कायम ठेवली आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही टी-20 मालिका गमावलेली नाही.

लोकेश राहुल आणि धवनने अर्धशतकी भागीदारी रचत संघावरील दबाव कमी केला. धावफलकावर 56 धावा असताना टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. राहुलने 30 धावा केल्या. झम्पाने शिखर धवनच्या खेळीला 52 धावांवर ब्रेक लावला. कर्णधार विराट कोहलीने 24 चेंडूत 40 धावांची उपयुक्त खेळी केली. संजू सॅमसन 15 धावांवरच बाद झाला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 42 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरने 5 चेंडूत 12 धावांची नाबा खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य टीम इंडियाने 6 गडी आणि 2 चेंडू राखून पार केले.  

 AUSvsIND : विराटनं कॅच सोडला तरी वेडला जावे लागले माघारी - VIDEO

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली असून त्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले.  कार्यवाहू कर्णधार मॅथ्यू हेडचे अर्धशतक (58) आणि त्यानंतर स्मिथनं हेन्रिक्सच्या साथीनं केलेली 48 धावांची महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने  निर्धारित 20 षटकात 5 बाद 194 धावा करत टीम इंडियासमोर 195  धावांचे लक्ष्य ठेवले होते. 


​ ​

संबंधित बातम्या