पाहुण्या टीम इंडियाला रोखण्यासाठी कांगारुंनी आखलाय खास 'गेम प्लॅन'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

2018-19 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या लढतीत वॉर्नर-स्मिथशिवाय मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

AUSvsIND Border Gavaskar Trophy 2020 : अ‍ॅडलेडच्या मैदानातील डे नाइट कसोटी सामन्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मर्यादीत सामन्यांच्या मालिकेत वनडेत ऑस्ट्रेलिया तर टी-20 मध्ये भारतीय संघ वर्चढ ठरला. पण कसोटी मालिकेत दोन्ही संघांचा चांगलाच कस लागणार आहे.  पाहुण्या संघातील फलंदाजांना शॉर्ट बॉलचा मारा करुन हैराण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे जोश हेजलवूने म्हटले आहे.

17 डिसेंबरला अ‍ॅडलेड येथील ओव्हलच्या मैदानात पहिला कसोटी सामना रंगणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासंदर्भातील गेम प्लॅनसंदर्भात जोश हेजलवून म्हणाला की, टीम इंडियाविरोधात बाऊन्सरचा माऱ्यासोबत शॉर्ट चेंडू टाकण्याची रणनिती अधिक प्रभावी ठरु शकते. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना शॉर्ट चेंडू खेळवण्यावर भर देण्याचा प्रयत्न राहिल. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर उतरताना भारतीय संघ देखील अशाच काहिशा रणनितीस उतरेल, असा अंदाजही त्यांने व्यक्त केला. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत हेजलवूड बोलत होता. 

ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन झाल्यानंतरही रोहितच्या फिटनेस 'टेस्ट'चा सिलसिला सुरुच राहणार!

आतापर्यंत हेजलवूडने 3 वनडे आणि 1 टी-20 असे चारवेळा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली आहे. यासंदर्भातही त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. विराट कोहलीला गोलंदाजी करताना नेहमीच नशिबाची साथ मिळाली आहे. मर्यादित षटकांतील विराट विरोधातील कामगिरी कसोटीतही करण्यास उत्सुक असल्याचे हेजलवूडने सांगितले. 

Australia vs India कांगारुंना मोठा धक्का; वॉर्नर पहिल्या टेस्टमधून आउट

2018-19 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या लढतीत वॉर्नर-स्मिथशिवाय मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आगामी मालिकेतही त्याला रोखण्याची मोठी कसोटी असेल, असे हेजलवूडने म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या