IND vs AUS - दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; दोघांचे पदार्पण

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 25 December 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीमधील हा दुसरा सामना आहे. या सामन्यासाठी भारताने संघात तीन बदल केले असून यातील दोघांचे आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण असणार आहे. 

नवी दिल्ली - भारता 26 डिसेंबरपासून ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटी खेळणार असून मेलबर्नवर हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीमधील हा दुसरा सामना आहे. या सामन्यासाठी भारताने संघात तीन बदल केले असून यातील दोघांचे आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण असणार आहे. 

कर्णधार विराट कोहली भारतात परतल्यानंतर संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. तर पृथ्वी शॉच्या जागी शुभमन गिलला संघात स्थान दिलं आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शुभमनला बॉक्सिंग डे कसोटोतून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. याशिवाय ऋद्धिमान साहाच्या जागी पंतला संघात घेतलं आहे. यष्टीरक्षक म्हणून त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यानं मोहम्मद शमी या सामन्याला मुकला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. त्याचा सुद्धा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे. याशिवाय रविंद्र जडेजा फिटनेस टेस्ट पास झाला असून त्याचाही समावेश संघात केला आहे. जडेजाला हनुमा विहारीच्या जागी घेण्यात येईल असं म्हटलं जात होतं. मात्र दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवलं आहे. 

हे वाचा - ''शॉ ऐवजी शुभमन गिलने डावाची सुरवात केल्यास त्याच्यावर टांगती तलवार''

अॅडलेडमधील कसोटीत भारतावर नामुष्कीजनक पराभव ओढवला होता. दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावात टीम इंडिया तंबूत परतली होती. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या