'गिल है की मानता नहीं'; सेहवागनं केली 'दिल जितनेवाली बात'!

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यासंदर्भात ट्विट केले आहे. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सर्व प्रयत्न केले. पण गिल है की मानता नहीँ, अशीच प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अवस्था झाली, असे ट्विट सेहवागने केले आहे.

Australia vs India, 4th Test : ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या निर्णायक कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीलाच रोहित शर्मा बाद झाला आणि भारतीय संघावर आभाळ कोसळल्याचे फिल झाले. पहिल्या सत्रातील खराब सुरुवातीनंतर युवा सलामीवीर शुभमन गिलने संघाला सावरलं. पुजाराच्या साथीनं त्याने भारताच्या डावाला आकार दिला. उपहारापूर्वी त्याने अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या अर्धशतकात एक उत्तुंग षटकार त्याचा आत्मविश्वास आसमानावर असल्याचे दाखवणारा होता. 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यासंदर्भात ट्विट केले आहे. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सर्व प्रयत्न केले. पण गिल है की मानता नहीँ, अशीच प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अवस्था झाली, असे ट्विट सेहवागने केले आहे. 'दिल है की मानता नहीं' या चित्रपटातील अमिर खान आणि पूजा भट्ट यांचा फोटोवर गिल है की मानता नहीं अशी पोस्ट सेहवागने केली आहे. सेहवाग सोशल मीडियावर आपल्या हटके अंदाजातील पोस्टमुळे लोकप्रिय आहे. या पोस्टलाही चांगलाच प्रतिसाद मिळत असून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.  

चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात त्यांनी 369 धावा केल्या. भारतीय संघाचा पहिला डाव 336 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष्य मिळाले असून शुभमनची खेळी भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या