"रोहितशिवाय वनडेत 350+धावा करणे मुश्किल"

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Tuesday, 1 December 2020

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला आकाश चोप्रा यांनी खास सल्लाही दिलाय. लोकेश राहुलने शिखर धवनसोबत डावाला सुरुवात करावी. यामुळे संघाच्या डावाची चांगली सुरुवात होण्यास मदत होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना कॅनबराच्या मैदानात रंगणार आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार असून या दौऱ्यात भारतीय संघ 4 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. 

India Tour Of Australia 2020 3rd ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यातील पराभानंतर मालिका गमावलेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात क्लिन स्वीप टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला न्यूझीलंडने क्लिन स्वीप केले होते. ही नामुष्की पुन्हा ओढावणार नाही या इराद्यानेच संघ मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही सामन्यात प्रथम फंलदाजी करत 350 + धावा करुन भारतावर दबाव टाकला होता. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी भारताच्या पराभवावर भाष्य करताना रोहित शर्माची उणीव भासत असल्याचे वक्तव्य कले आहे.  रोहित शिवाय भारतीय संघ  350+धावा करु शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात  374 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या सामन्यात यजमानांनी भारतासमोर पहिल्या सामन्यापेक्षा अधिक लक्ष्य ठेवले. 390 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 51 धाावांनी पराभव स्वीकारावा लागला. आकाश चोप्रा आपल्या युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात म्हणाले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच रोहित शर्माची उणीव भासत आहे. भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या धावांचा पाठलाग करायचा होता.  जर रोहित शर्मा असता तर तो आक्रमक अंदाजात खेळताना दिसला असात. तो नसल्यामुळेच भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. जर तुम्हाला 350 + धावा करायच्या असतील तर रोहित संघात असणे गरजेचे आहे. त्याच्या शिवाय एवढी धावसंख्या उभारणे शक्य नाही.  

भारतीय तिरंदाज कपिलला कोरोना विषाणूची लागण
 
आयपीएल स्पर्धेदरम्यान स्नायूची दुखापत उद्भवल्यामुळे भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा याची मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड झाली नव्हती. तो आयपीएलमध्ये खेळत असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यात का खेळू शकत नाही? असा प्रश्नही अनेकांना पडला. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी उत्तरही दिले. रोहित शर्मा हा 70 टक्के फिट आहे. 100 टक्के फिटनेससाठी त्याला विश्रांतीची गरज आहे, असे स्पष्टीकरण गांगुलींनी दिले होते. सध्याच्या घडीला रोहित शर्मा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. कसोटी मालिकेत तो संघात कमबॅक करेल, अशी आशा आहे. यावेळी आकाश चोप्रांनी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलच्या खेळीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. लोकेश राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उपयुक्त ठरताना दिसत नाही, असे ते म्हणाले.  

फॉर्म्युला वनमधील धोका पुन्हा अधोरेखित 

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला आकाश चोप्रा यांनी खास सल्लाही दिलाय. लोकेश राहुलने शिखर धवनसोबत डावाला सुरुवात करावी. यामुळे संघाच्या डावाची चांगली सुरुवात होण्यास मदत होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना कॅनबराच्या मैदानात रंगणार आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार असून या दौऱ्यात भारतीय संघ 4 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या