क्वारंटाईन होणार असाल तरच खेळायला या; टीम इंडियाला इशारा

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

राज्याच्या आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी ऑस्ट्रेलियन चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टीम इंडियाला इशारा दिलाय.

भारतीय संघाचा चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावरुन आता नवीन वादंग उठले आहे. भारतीय संघ सातत्याने क्वारंटाईन प्रक्रियेला हैराण झाला असून ब्रिस्बेनमध्ये पुन्हा क्वारंटाईन होण्यापेक्षा सिडनीतच दोन्ही सामने खेळण्याच्या मानसिकतेत आहे. त्यानंतर क्वींसलंड सरकारच्यावतीन भारतीय संघाच्या भूमिकेवरुन वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. 

टीम इंडियाला नियमाप्रमाणे खेळायचे नसेल तर त्यांनी ब्रिस्बेनमध्ये येऊ नये, अशा भाषेचा वापर करण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी ऑस्ट्रेलियन चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टीम इंडियाला इशारा दिलाय. जर इंडियन्सना नियमानुसार खेळायचे नसेल तर त्यांनी इकडे येऊच नये, असे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. क्वींसलंडच्या क्रीडा मंत्र्यांनीही आरोग्य मंत्र्यांच्या सूरात सूर मिसळत टीम इंडियाला गाईड लाइन्स फॉलो कराव्याच लागतील, असे म्हटले आहे. सर्वांना एकसारखेच नियम आहेत, असा उल्लेखही क्वींसलंड सरकारच्या मंत्र्यांनी केलाय.  

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

क्रिकबझने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन दिलेल्या वृत्तनुसार, ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूदुबईत 14 दिवस क्वारंटाईन होते. ऑस्ट्रेलियामध्ये पोहचल्यानंतर पुन्हा त्यांनी क्वारंटाईनचा नियम फॉलो केला. टीम इंडिया जवळपास एक महिने क्वांरटाईन राहिली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाने वेगवेगळ्या राज्यातील नियमांचे पालन करत त्या त्या राज्याला सहकार्य केले. पण आता क्वारंटाईनचा निर्बंधात राहण्यात टीम इंडिया तयार नाही. ब्रिस्बेन कसोटीसाठी क्वांरटाईन होण्यापेक्षा सिडनीतच चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळण्याची तयारीही टीम इंडियाने दर्शवली आहे.


​ ​

संबंधित बातम्या