AUSvsIND : सामना गमावल्यास विराटच्या नावे होईल लाजिरवाणा विक्रम 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिले दोनही सामने भारताला गमवावे लागले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिले दोनही सामने भारताला गमवावे लागले आहेत. आणि यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने सलग दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. त्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज कॅनबेराच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. आणि या सामन्यात भारतीय संघाला पराभवास सामोरे जावे लागले तर विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम होणार आहे. 

रोहितसारख्या दुखण्यानं घेरलं; टीम इंडियातील गड्याला मायदेशी धाडलं

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग पाच सामने गमावलेले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यांअगोदर भारतीय संघाला न्यूझीलंडच्या संघाकडून तीन सामन्यांमध्ये हार स्वीकारावी लागली होती. व त्यामुळे आज होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली तर संघाचा कर्णधार म्हणून विराटच्या नावावर लाजिरवाणा विक्रम होणार आहे. आणि त्यामुळे विराट कोहलीचा सुनील गावस्कर यांच्या यादीत समावेश होईल. आतापर्यंत अन्य कोणत्याही भारतीय कर्णधाराने सलग पाचपेक्षा जास्त सामने गमावलेले नाहीत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पाहावा लागल्यामुळे कर्णधार म्हणून विराट कोहलीचा समावेश सलग पाच सामने गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत झाला आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी (2015 ते 2016), त्यानंतर सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (1988) आणि माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर (1989) यांच्या नावावर कर्णधार म्हणून  सलग पाच सामने गमावल्याचा लाजिरवाणा विक्रम आहे.   

विराट कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठयावर 

तर, सुनील गावस्कर हे 1981 मध्ये कर्णधार असताना भारतीय संघ सलग सात सामन्यांमध्ये हरला होता. त्यामुळे जर आजचा सामना भारताने गमावला तर विराट कोहली या लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या नंबरवर येईल. 

सर्वात अधिक वेळा पराभव पत्करावे लागलेले कर्णधार -
सुनील गावस्कर - 7
रवी शास्त्री - 5
दिलीप वेंगसरकर - 5
महेंद्रसिंग धोनी - 5
विराट कोहली - 5 


​ ​

संबंधित बातम्या