लांबणाऱ्या खेळास केवळ गोलंदाजी संघच कसा जबाबदार? 

संजय घारपुरे
Monday, 30 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या दोन्ही लढती लांबल्यामुळे दोष विराट कोहलीस दिला जात आहे, पण केवळ क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करणारा संघच यास जबाबदार नसतो, असा दावा माजी पंच सायमन टॉफेल यांनी केला आहे.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या दोन्ही लढती लांबल्यामुळे दोष विराट कोहलीस दिला जात आहे, पण केवळ क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करणारा संघच यास जबाबदार नसतो, असा दावा माजी पंच सायमन टॉफेल यांनी केला आहे. टॉफेल यांनी यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघासही दंड करण्याची सूचना चर्चेस आली होती, याची आठवण करून दिली. 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाला धक्का; तिसऱ्या वन-डे व टी-ट्वेन्टीमधून हुकमी एक्का...

पहिल्या सामन्यात भारतास एका षटकाचाच दंड झाला होता. याचाच अर्थ भारतास 28 मिनिटांची सूट देण्यात आली होती. दुसऱ्या सामन्यात भारतीयांनी 20 मिनिटे जास्त घेतली, पण दंड झाला नाही. यास दरवेळी क्षेत्ररक्षण करणारा संघच जबाबदार नसतो, असे टॉफेल यांनी सांगितले. या संघावर टीका करताना अतिरिक्त मागवलेले ड्रिंक, ग्लोव्हज्‌ तसेच बॅट बदलणे, साईटस्क्रीन हलवणे यात गेलेला वेळ तसेच मैदानातील घुसखोरीही लक्षात घ्यायला हवी, याकडे टॉफेल यांनी लक्ष वेधले. काही तज्ज्ञांनी स्टॅंडमध्ये गेलेला चेंडू पुसून देण्यातही आता वेळ जात आहे, हेही नमूद केले. 

विराटची कॅप्टन्सी समजण्यापलीकडे; गौतम गंभीरची टीका   

पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितल्यास वेळ जातो, तसेच पंचही चौकार, षटकाराबाबत खातरजमा करण्यासाठी, तसेच काही निर्णयांबाबत दूरचित्रवाणी पंचांबरोबर चर्चा करतात, यातही नक्कीच वेळ जातो. आता तंत्रज्ञानाची मदत घेतल्याची किंमत आपल्याला मोजावी लागत आहे, असे सांगतानाच टॉफेल यांनी पंचांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास षटके वेगाने पूर्ण करण्यासाठी दबाव आणायला हवा. पंचांनी एक षटक कमी आहे, हे सांगितल्यावर कर्णधार त्याकडे फारसे लक्षही देत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


​ ​

संबंधित बातम्या