"बाहेर सर्व नॉर्मल असताना हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणं आव्हानात्मक; पण.."

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

क्वारंटाईनमधील जगणे आव्हानात्मक असल्याचे सांगताना अजिंक्यनं सर्व खेळाडू नियमाचे पालन करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.सिडनी कसोटीपूर्वी अजिंक्य म्हणाला की, क्वारंटाईन हे आमच्यासमोरील मोठं आव्हानच आहे.

AusvsInd : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील काही खेळाडूंनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचा बोबाटा ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी केला होता. बीसीसीआयने यासंदर्भातील सर्व बातम्या फोल असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी लिलीया पेलणाऱ्या अजिंक्य रहाणेनं क्वारंटाईनसंदर्भात वक्तव्य केले आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याठिकाणी सामान्य परिस्थिती असताना क्वारंटाईनमध्ये राहणे खूप अवघड असते, असे मत अजिंक्य रहाणेनं व्यक्त केले आहे.

क्वारंटाईनमधील जगणे आव्हानात्मक असल्याचे सांगताना अजिंक्यनं सर्व खेळाडू नियमाचे पालन करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.सिडनी कसोटीपूर्वी अजिंक्य म्हणाला की, क्वारंटाईन हे आमच्यासमोरील मोठं आव्हानच आहे. या परिस्थितीत जुळवून घेत क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यावर संघ भर देत आहे. सिडनीमधील परिस्थिती ही सामान्य आहे. मात्र तरीही आम्हाला क्वारंटाईनमध्ये रहावे लागत आहे. आम्ही इथे क्रिकेट खेळायला आहो आहोत. त्यामुळे या गोष्टीवर अधिक भर न देता चांगला खेळ दाखवण्यावर फोकस करत आहोत. 

AusvsInd : हिटमॅन रोहितच्या कमबॅकमुळं मयांक बाकावर; सैनी करणार पदार्पण

संघातील कोणताही खेळाडू  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही किंवा तसे घडणारही नाही, असेही भारतीय कर्णधाराने म्हटले आहे. 
तिसऱ्या कसोटीपूर्वीच ब्रिस्बेनमध्ये रंगणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीसंदर्भात चांगलीच चर्चा रंगली होती. भारतीय संघ क्वारंटाईन होण्यास तयार नसून ब्रिस्बेनला जाण्यासंदर्भात विचार सुरु आहे, अशी चर्चा रंगली होती. यासंदर्भात अजिंक्य रहाणेनं चेंडू बीसीसीआयच्या पारड्यात टोलवाला. ब्रिस्बेन कसोटीसंदर्भातील निर्णय बीसीसीआय घेईल, असे त्याने सांगितले.  

आयपीएल स्पर्धेपासून भारतीय खेळाडून बायो-बबलमध्ये आहेत. बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंवरील काही निर्बंध हटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही बोलले जात आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली असून सिडनीतील निकाल कोणाच्या बाजून झुकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या