हिटमॅनच्या आगमनाने टीम इंडियाच्या ताफ्यात दिसला जल्लोष; पहा व्हिडिओ  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघात सामील झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघात सामील झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला. त्यानंतर आज रोहित शर्मा मेलबर्न येथे भारतीय संघात सामील झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. 

AUSvsIND 3rd Test : टीम इंडिया सावधान! वॉर्नर कमबॅक करतोय

ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर रोहित शर्मा सिडनी येथे क्वारंटाईन होता. त्यानंतर आता तो सिडनीतून मेलबर्न येथे जात भारतीय संघात सहभागी झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावरील ट्विटरवर रोहित शर्मा भारतीय संघातील खेळाडूंना भेटत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या व्हिडिओत रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भेटत असल्याचे दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे असलेल्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत (एनसीए) रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता. तर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सुरवातीला काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. व त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील तो अनुपस्थित राहिला होता.     

AUSvsIND 2nd Test : या 5 गोष्टींच्या जोरावर टीम इंडियाने मेलबर्नचे मैदान मारलं

दरम्यान,  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.


​ ​

संबंधित बातम्या