AUSvsIND 3 T20 : सामन्यातील काही खास क्षण एका नजरेत (फोटो)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाला 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाला 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकात पाच गडी गमावत 186 धावा केल्या होत्या. तर भारतीय संघ 20 षटकांत सात गडी गमावून 174 धावांपर्यंतच पोहचू शकला. 

AUSvsIND : कोहलीचा ऑस्ट्रेलियात डंका; नावावर झाले 'विराट' रेकॉर्डस्   

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर कांगारुंची सुरवात फारशी चांगली झाली नव्हती. 

भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकात फुलफॉर्म मध्ये असलेल्या ऍरॉन फिंचला शून्य धावांवर माघारी धाडले. 

त्यानंतर स्टीव्ह स्मिथला देखील सुंदरने 24 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलाच धक्का दिला.   

मॅथ्यू वेड आणि मॅक्सवेल यांनी मैदानावर पाय रोवत 90 धावांची भागीदारी रचली. वेडने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. 

मॅक्सवेलने 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना, भारताची सुरवात देखील खराब झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला अवघ्या शून्य धावांवर मॅक्सवेलने स्टीव्ह स्मिथ करवी झेलबाद केले. 

शिखर धवनला मिचेल स्वीप्सनने बाद केले. 

धवननंतर संजू सॅमसन आजच्या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला देखील स्वीप्सनने माघारी पाठवले. 

दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात धमाकेदार कामगिरी करणारा हार्दिक पांड्या देखील आज लवकर बाद झाला. हार्दिक पांड्याने कोहलीला साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला ऍडम झम्पाने फिंचकडे झेलबाद केले. 

विराट कोहली टायच्या गोलंदाजीवर डॅनियल सॅमकडे झेल देऊन बसला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या उरल्या-सुरल्या आशा देखील धूसर झाल्या. 

दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबर पासून खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या