AUSvsIND 2 T20 : सामन्यातील काही खास क्षण एका नजरेत (फोटो)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

ऑस्ट्रेलिया सोबतची एकदिवसीय मालिका भारताला गमवावी लागली आहे. मात्र भारतीय संघाने टी-ट्वेन्टी मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेतला आहे

ऑस्ट्रेलिया सोबतची एकदिवसीय मालिका भारताला गमवावी लागली आहे. मात्र भारतीय संघाने टी-ट्वेन्टी मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेतला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील भारताने ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकांत पाच गडी गमावत 194 धावा केल्या होत्या. तर भारताच्या संघाने 195 धावांचे डोंगर शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांच्या जोरावर गाठले. 

AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर वेड आणि शॉर्ट यांनी पहिल्या विकेट साठी 47 धावांची भागीदारी रचली. टी नटराजनने शॉर्टला अवघ्या नऊ धावांवर माघारी धाडले. 

अर्धशतक करणाऱ्या वेडला विराट कोहलीने धावबाद केले. 

वेड बाद झाल्यानंतर आलेल्या मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न करत भागीदारी रचली. मॅक्सवेलने आजच्या सामन्यात पुन्हा एकदा वेगवान फलंदाजी करत धावा करत असतानाच त्याला शार्दूल ठाकूरने सुंदरकडे झेलबाद केले. 

चहलने आजच्या सामन्यात पन्नासहून अधिक धावा दिल्या असल्यातरी, त्याने घातक ठरत असलेल्या स्टीव्ह स्मिथला 46 धावांवर रोखले.        

       

भारताच्या डावाची सुरवात शिखर धवन आणि केएल राहुल या दोघांनी करत पहिल्या विकेटसाठी 56 धावांची मजबूत भागीदारी केली.

विराट कोहली 40 धावांवर असताना त्याला डॅनियल सॅमने झेलबाद केले. विराट कोहली बाहेर जात असलेल्या चेंडूवर शॉट मारण्याच्या नादात स्वीप्सनकडे झेल देऊन बसला. 

हार्दिक पांड्याने 22 चेंडूत वेगवान खेळी करत 42 धावा केल्या.    

दरम्यान, यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-ट्वेन्टी सामना मंगळवारी आठ तारखेला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या