हार्दिक पांड्या हा धोनी आणि युवराज सिंग सारखा फलंदाज 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 195 धावांचे लक्ष्य दिले होते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 195 धावांचे लक्ष्य दिले होते. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-ट्वेन्टी सामना जिंकला होता. अखेरच्या षटकात भारताला 14 धावांची गरज होती. आणि हार्दिक पांड्याने या षटकात दोन षटकार खेचून भारतीय संघाला विजयी केले होते. त्यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने हार्दिक पांड्याचे कौतुक करतानाच तो कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, असे गंभीरने म्हटले आहे. 

टी नटराजन एक निर्भिड गोलंदाज; वाचा कोण म्हणाले  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांडयाने दमदार फलंदाजी करवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर टी-ट्वेन्टी मालिकेतील सामन्यांमध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे क्रिकेट जगतातून सगळयांनीच हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे. आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग त्यांच्यासारखाच धमाकेदार फलंदाज असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी धोनी आणि युवराज हे दोघेही भारतासाठी सामने जिंकवून देत होते. आणि आता हार्दिक देखील त्यांच्याप्रमाणेच खेळ करत असल्याचे वर्णन गौतम गंभीरने केले आहे. 

ICC Test Rankings : विल्यमसनने रन मशीन विराटला टाकले मागे  

याशिवाय हार्दिक पांड्या जर शेवटच्या षटकात फलंदाजी करत असेल तर, तो वीस-पंचवीस पेक्षा अधिक धावा बनवू शकतो. तसेच हार्दिकने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत मुंबई इंडियन्स कडून फलंदाजी करताना केलेली खेळी ही आत्ताच्या खेळीसमोर सर्वसाधारण असल्याचे गंभीरने सांगितले. त्यामुळे आयपीएल मध्ये खेळल्याचा फायदा हार्दिकला अधिक होत असल्याचे गौतम गंभीर म्हणाला. तसेच अशा खेळीमुळे हार्दिक पांड्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल, असे गौतम गंभीर यावेळेस म्हटले आहे.       


​ ​

संबंधित बातम्या